Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

शुक्रवार, १७ जुलै, २०२६

मतदार जनजागृतीसाठी जयेश शिवराज चौधरी यांचा पुढाकार; SIR प्रक्रियेसाठी नागरिकांना मोफत मार्गदर्शन


| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक १७ जुलै २०२६ : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision - SIR) मोहिमेअंतर्गत नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य मिळावे या उद्देशाने वार्ड क्रमांक २१ चे चे भाजपा पदाधिकारी जयेश शिवराज चौधरी यांनी नागरिकांसाठी मोफत मदत व मार्गदर्शन केंद्र सुरू केले आहे. या उपक्रमांतर्गत मतदार यादीत नाव शोधणे, मतदार नोंदणी व पडताळणी प्रक्रियेबाबत माहिती देणे, आवश्यक कागदपत्रांची माहिती उपलब्ध करून देणे तसेच संबंधित BLO (Booth Level Officer) यांच्याशी संपर्क साधून देणे यासाठी नागरिकांना विनामूल्य मदत केली जात आहे.

अनेक नागरिकांना SIR प्रक्रियेबाबत माहिती नसल्याने किंवा विविध तांत्रिक अडचणी येत असल्याने त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे, मतदार म्हणून त्यांचे अधिकार अबाधित राहावेत आणि कोणत्याही पात्र मतदाराला गैरसोय होऊ नये या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे जयेश शिवराज चौधरी यांनी सांगितले. ज्या नागरिकांना मतदार यादी, SIR फॉर्म, नाव पडताळणी अथवा इतर निवडणूकविषयक बाबींमध्ये अडचणी येत असतील त्यांनी PWD २५/११, अशोक थिएटर समोर, श्री. जयेश शिवराज चौधरी यांच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून स्वागत होत असून लोकशाही प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा