Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

बुधवार, २९ जुलै, २०२६

अल्पवयीन दोन मुलींवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी ६१ वर्षीय आरोपी अटकेत; वाकड पोलिसांकडून पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल


अल्पवयीन दोन मुलींवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी ६१ वर्षीय आरोपी अटकेत; वाकड पोलिसांकडून पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

लहान मुलींच्या अत्याचारा याविरोधात शांततेत मोर्चा ; तायवाडे ते डांगे चौक

| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक २९ जुलै २०२६  : वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ६१ वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. २८ जुलै रोजी पीडित मुलीच्या घराचे नातेवाईक यांनी तक्रार देण्यासाठी वाकड पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. यावेळी परिसराती विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ तसेच पॉक्सो (POCSO) कायदा आणि अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला आईने दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला. आरोपीने फिर्यादीच्या १० वर्षीय मुलीला तोंड दाबून स्वतःच्या घरी नेले आणि तिच्यावर वारंवार जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच फिर्यादीच्या ४ वर्षीय मुलीलाही जबरदस्तीने आरोपीच्या घरी नेल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात २८ जुलै २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त सुनील कुराडे (वाकड विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

अल्पवयीन लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये कायद्यानुसार पीडितांची ओळख गोपनीय ठेवण्यात येते. त्यामुळे त्यांची नावे किंवा ओळख उघड करण्यात आलेली नाही. परंतु पोलिसांनी जारी केलेल्या प्रेस नोट मध्ये आरोपीचे नाव उघड केलेले नाही त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.

अलीकडच्या कळतात लहान मुलींवर होणारे अत्याचार वाढले असून त्यावर सबंधित प्रशासन आणि शासन स्तरावर कठोर नियोजन करून कडक कारवाई करणे गरजेचे असताना घडत असलेले प्रकार गंभीर आहेत. असे प्रकार पुन्हा घडू नयेत म्हणून पिंपरी चिंचवड शहरातील शिवसेना संघटिका रितू कांबळे आणि कार्यकर्ते पदाधिकारी यांनी शांततेत मोर्चा काढण्याचे जाहीर केले असून दिनांक २९ रोजी ताथवडे येथील नृसिंह चौक ते डांगे चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक दरम्यान रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती सोशल माध्यमांवर प्रकाशित करण्यात आली आहे. घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आणि आरोपीला तत्काळ कठोर शिक्षा होण्यासाठी सबंधित रॅली काढली जाणार असून परवानगीसाठी पोलिसात अर्ज दिला आहे. यामध्ये शांततेच्या मार्गाने जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा