Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

मंगळवार, १४ जुलै, २०२६

इंद्रायणी कॉलेज येथे ओम समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट इंडिया च्या वतीने विद्यार्थी विद्यार्थीनी साठी जनजागृती उपक्रम संपन्न

 

 

| सांगावा न्यूज | तळेगाव दाभाडे, दिनांक १४ जुलै २०२६ : इंद्रायणी कॉलेज तळेगाव दाभाडे येथे ओम समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट इंडिया संस्थेच्या वतीने ११ वी नवीन ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांना अन्याय विरुद्ध लढा देत आपल सिद्ध करीत आई वडील गुरुजन यांचा विश्वास जपण्या संदर्भात जनजागृती उपकरण संपन्न झाला. मुला मुलींनी कोणत्याही परिस्थिती खचून न जाता जीवनात पूढे कसे जावे, लव्ह जिहाद यासारख्या गोष्टीला बळी पडू नये, मोठया माणसांचा आदर ठेवून संवाद कसा करावा, वाहतुक नियमाचे पालन इत्यादी विषयांवर देखील मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध वक्ते मा. नितीन फाकटकर यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. आयुष्यात एक दृढ निश्चित करणे एकच लक्ष साधून पूढे जाणे. फोन वर स्टेटस ठेवून प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा आपल्या कार्यातून व अभ्यातून चांगले गुण मिळविले तर शिक्षण आणि पालक मित्रमंडळी हे तुमचे स्टेटस ठेवतील. कुठल्याही ऍप, सायबर च्या बळी पडू नका असे प्रबोधन करीत उपस्थित वक्त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमांची सुरवात कॉलेज चे प्रा. योगेश घोडके यांनी प्रस्तावना करून केली तर सौं. सविता पालवे यांनी संस्थेची माहिती दिली. यावेळी सौ. रेश्मा फडतरे यांनी संस्थेविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. दामिनी पथक विषयी माहिती सोनाली शिंदे यांनी दिली. मनोगत श्री तुषार मेहता तर आभार श्री कृष्णा भांगरे यांनी केल. 

या कार्यक्रमास ओम समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट इंडिया च्या संस्थापक मललेशी कुमार पाणी, अध्यक्ष तुषार मेहता, उपाध्यक्ष रेश्मा फडतरे, सचिव प्रवीण दाभाडे, सहसचिव सविता पालवे, खजिनदार ऍड. सुरेंद्र दाभाडे, ऍड. तेजस दाभाडे, कृष्णा भांगरे, दिलीप वाघमारे, श्रावणी कामत, बाळशंकर, रुपाली मेहता, गोरख काकडे, जेष्ठ पत्रकार जगन्नाथ काळे, शिक्षक, विद्यार्थी आदी मान्यवर उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा