Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

सोमवार, १० ऑगस्ट, २०२६

जागतिक आदिवासी दिनानिमित्त मार्गदर्शन मेळावा संपन्न


पारधी समाजातील युवकांनी पुढे येऊन नवीन पिढी घडवावी __नगरसेवक धर्मपाल तंतरपाळे

| सांगावा न्यूज  | देहू, दिनांक ९ ऑगस्ट २०२६ :  नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी पारधी समाज सुरक्षा दल व आदिवासी युवा विकास संघाच्या वतीने देहुगाव राधाकृष्ण लॉन्स येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त मार्गदर्शन मेळावा व समाजातील पदवीधरांचा सन्मान सोहळा  समाज बांधवांच्या उपस्थितीत पार पडला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शैलेंद्र मोरे तसेच   कामगार चळवळीतील नेत्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला महिलांचा उदंड प्रतिसाद पाहण्यास मिळाला. महिलांना वृक्ष  आणि महिलांचा सन्मान यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कार्यसम्राट नगरसेवक व सामाजिक क्षेत्रातील गाढे अभ्यासक धर्मपालजी तंतरपाळे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रस्तावना करताना अध्यक्ष तसेच कार्यक्रमाचे संयोजक माऊली उर्फ किसन भोसले म्हणाले की, "हा कार्यक्रम घेण्याचे कारण म्हणजे आदिवासी पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे मुख्य उद्दिष्ट आहे तसेच विविध क्षेत्रातील उत्कृष्ट सामाजिक काम करणाऱ्या मान्यवरांचे मार्गदर्शन समाजाला झाले पाहिजे आणि त्यांचाच आदर्श व मार्गदर्शन, विचार समाजाने आत्मसात करून समाजाने मुख्य प्रवाहात येण्यासाठी फायदा करून घेतला पाहिजे"

आदिवासी पारधी समाजाकडे संधी आणि क्षेत्र असेल तर ते शिक्षणाचे क्षेत्र आहे." शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो प्राशन करील तो डरकाळी फोडल्याशिवाय राहणार नाही" हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितला संदेश समाजातील प्रत्येकाने आत्मसात कारणे आवश्यक आहे. असे मत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक तंतरपाळे साहेबांनी व्यक्त केले.

कामगार नेते यशवंतराव भोसले म्हणाले, "समाजाची इथून पुढची पिढी चांगलं शिक्षण घेऊ लागलेली आहे. अजून पारधी समाजातील जास्तीत जास्त मुला मुलींनी पुढे येऊन शिक्षण घेऊन डॉक्टर, वकील इंजिनियर, कलेक्टर, तलाठी, ग्रामसेवक असे झाले पाहिजे, तरच पारधी समाज मुख्य प्रवाहात येईल आणि समाजाचा उद्धार होईल.

या कार्यक्रमाला रिपब्लिकन जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शैलेंद्रजी मोरे, प्रवीण भोसले, देहू नगर परिषदेचे मुख्याधिकारी चेतन कोंडे साहेब, नगरसेवक कुणाल वाव्हळकर, नगरसेविका अनुराधाताई गोरखे, प्राध्यापक युवराज तिकटे, देहूच्या नगराध्यक्ष पूजाताई दिवटे, पथविक्रेता समिती सदस्य प्रल्हाद कांबळे, उत्तमरंगा सकटे,पत्रकार लहू आडसूळ, विशाल भोसले, अनिल वडघुले, व कार्यक्रमाचे निमंत्रक अंकुश भोसले यांच्या सह हजारोंच्या संख्येत आदिवासी पारधी समाजाचे इतर नागरिक उपस्थित होते. समाजाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हिराज पवार, दीपक काळे, योगेश पवार, मॅनेजर भोसले, पत्रकार भीमराव बरकडे, सोमनाथ काळे, बी.के भालेराव, दस्तगीर काळे, अनिल पवार,ओमकार काळे, मीटर पवार, दिनेश काळे, नागेश भोसले, संघटनेच्या अध्यक्षा सौ.शन्नू भोसले, महिला उपाध्यक्ष सौ.शैला शिंदे, महिला संघटक सौ.शारदा काळे, जय रविराज भोसले, अनुराग पवार, हर्षल चव्हाण, राकेश चव्हाण, किशोर भोसले, प्रीतम भोसले, शुभम रमेश भोसले, शेखर चव्हाण,ओम चव्हाण, छबू चव्हाण, लांगसाहेब भोसले, भाऊलाल चव्हाण, नोतन भोसले, रमेश भोसले, शरद चायडू भोसले, सोनू चव्हाण, राम चव्हाण, अमोल भोसले, आकाश भोसले, यश चव्हाण, फरीदा चव्हाण, सुगंधा भोसले, निर्मला भोसले, रंजना काळे, उषा चव्हाण, सारिका भोसले, अर्जुन पवार यांच्यासह इतर मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा