Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

सोमवार, ७ सप्टेंबर, २०२६

आरपीआय च्या चिंचवड विधानसभा अध्यक्षपदी अमोल जावळे यांची निवड


शहरातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचा आरपीआय मध्ये जाहीर प्रवेश 

| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक ७ सप्टेंबर २०२६ : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) च्या चिंचवड विधानसभा अध्यक्षपदी युवा नेते अमोल भास्कर जावळे यांची निवड करण्यात आली. केंद्रीय मंत्री तथा आरपीआय (आठवले गट) चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या हस्ते रविवार दिनांक ६ सप्टेंबर रोजी पिंपरी चिंचवड येथे आयोजित कार्यक्रमात जावळे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी आरपीआय (आठवले गट) चे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष व नगरसेवक कुणाल वावहळकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व इतर मान्यवर उपस्थित होते.

अमोल जावळे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत भास्कर जावळे, दुशांत जावळे, कांचन जावळे, रोहित सरोदे, अमित वाघमारे, विनीत कांबळे, सौरभ वाघमारे, सोहम गायकवाड यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी आरपीआय (आठवले गट) मध्ये जाहीर प्रवेश केला.

पिंपरी चिंचवड शहरातून युवा नेतृत्वाला मिळाली संधी 
चिंचवड विधानसभा मतदारसंघात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी तसेच युवकांना पक्षाच्या प्रवाहात जोडण्यासाठी अमोल जावळे यांच्या नियुक्तीला महत्व प्राप्त झाले आहे. त्यांच्या निवडीमुळे पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

"समाजातील वंचिंत, शोशित घटकांसाठी सदैव लढणारे रामदास आठवले यांचे विचार हा आमचा मार्ग आहे. पक्षाच्या वाढीसाठी आम्ही सर्वजण एकजुटीने काम करू"
__अमोल भास्कर जावळे (नवनिर्वाचित अध्यक्ष : आरपीआय चिंचवड विधानसभा)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा