सांगावा, पुणे. दिनांक. २२ : राष्ट्रीय शिक्षक दिनाचे औचित्य साधून खडकी शिक्षण संस्था यांच्या वतीने दिला जाणारा प्रथम स्वर्गीय आ.चंद्रकांत छाजेड आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार-2024 नुकताच खडकी कटक मंडळाचे कर्नल भगत इंग्लिश स्कुल,खडकी शाळेचे शिक्षक श्री गणेश सुवासे यांना प्रदान करण्यात आला. माध्यमिक विद्यालय पिंपळे गुरव शाळेचे मुख्याध्यापक श्री.पांडुरंग मुदगुण, कर्नल भगत शाळेच्या सहकारी शिक्षिका डॉ.निता देशमुख इत्यादी शिक्षकांसह खडकी विभागातील अन्य 8 गुणवंत शिक्षकांना त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन पुरस्कार देण्यात आला.सुवासे यांनी गणित विषयाच्या अध्यापनासह क्रीडानिकेतन शाळेच्या माध्यमातून खो-खो या खेळप्रकारात राज्य व राष्ट्रीयस्तरावरील अष्टपैलू खेळाडू घडवले आहे .
सदर पुरस्कार वितरण सोहळा खडकी शिक्षण संस्थेचे संस्थापक मा. श्री. कृष्णकुमार गोयल व संस्थेचे सचिव आनंद छाजेड व डॉ.वसंत वाघ (माजी प्राचार्य, फर्ग्यूसन कॉलेज) यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयातील सभागृहात संपन्न झाला.
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा