Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

रविवार, २० ऑक्टोबर, २०२४

' वृंदावन ' वडीलधाऱ्या वृद्धांसाठी आपलं घर अढले बुद्रुक येथे स्थापन : वृंदावन फाऊंडेशन वृध्दाश्रम, भगतवाडी

 वृध्द व्यक्तींच्या आश्रयासाठी संदीप बोडके यांनी खुले केले स्वतः चे घर 

वृंदावन फाऊंडेशन वृध्दाश्रम च्या उद्घाटन प्रसंगी बोलतांना प्रबोधनकार शारदाताई मुंडे आणि उपस्थित मान्यवर 

सांगावा न्युज, मावळ. दि. २० : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात अढले बु. भगतवाडी याठिकाणी संदीप बोडके आणि मित्र परिवाराने वृंदावन फाऊंडेशन वृध्दाश्रम सुरू केले आहे. कै. बंडू दामू बोडके यांच्या स्मरणार्थ हे वृध्दाश्रम स्थापन झाले असून आज विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत याठिकाणी उद्घाटन सोहळा संपन्न झाला. माजी राज्यमंत्री संजय ( बाळा ) भेगडे, अखिल किसान मोर्चाचे गणेश ( तात्या ) भेगडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बापू ( अण्णा ) भेगडे यांच्यासह ज्येष्ठ कलाकार प्रबोधनकार सौ. शारदाताई मुंडे यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रण होते . रामचंद्र मधुकर बोरगे आणि युवराज परमेश्वर सुरवसे या विश्वस्थांसह संस्थापक अध्यक्ष संदीप बंडू बोडके उपस्थित होते. यावेळी गावकरी, पंचकृशितील मान्यवर आणि पत्रकार बंधू भगिनी उपस्थित होते. यावेळी पत्रकारितेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. रक्तदान तसेच मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर आणि मोफत चेष्मे वाटपाचा कार्यक्रम देखील घेण्यात आला. 

आजकाल शहरी भागासह ग्रामीण भागात देखील वृद्धाश्रमाची संख्या वाढत आहे. मुलं आपल्या आई वडिलांना घरी सांभाळत नाहीत ही खरं म्हणजे समाजात खंत व्यक्त करणारी गोष्ट आहे . पण वाढत्या वृध्दाश्रमा बरोबर काही लोकांसाठी हा एक व्यवसाय झाला असला तरीदेखील , या व्यावसायिक व्यवहारी जगात वावरत असताना संदीप बोडके यांनी सुरू केलेल्या वृंदावन फाऊंडेशन वृध्दाश्रम मध्ये आलेल्या वृध्दांना विनामूल्य सेवा मिळणार आहे. आपलं स्वतः चं राहत घर वृद्धाश्रमासाठी खुले केले असून असे संवेदनशील व्यक्तिमत्त्व समाजात आहेत हे समाजाचे भाग्य म्हणावे लागेल. असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. यावेळी प्रबोधनकार सौ. शारदाताई मुंडे आणि गणेश ( तात्या ) भेगडे यांनी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन केले. 

यावेळी संस्थेचे मार्गदर्शक बाळासाहेब घोटकुले भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष, सचिन घोटकुले राष्ट्रवादी युवक अध्यक्ष पुणे जिल्हा, नितीन घोटकुले अध्यक्ष इको व्हिलेज गोधाम, सरपंच सुवर्णाताई बाळासाहेब घोटकुले, नगरसेवक कैलास उर्फ बाबा बारणे, नगरसेवक पांडा भाऊ वहिले ,भाजपा नेते तानाजी बारणे, उपसरपंच तानाजी नामदेव घोटकुले, उद्योजक मनोज ढमाले, सरपंच परंदवाडी वसंत पापळ ,उद्योजक गणेश खानेकर, उद्योजक संदीप नवले , उद्योजक सुनील पवार असेन्तिक फॅसिलिटी प्रायव्हेट लिमिटेड, उद्योजक हर्षद मोहेकर, उद्योजक प्रशांत हारणे पदमजी हायजिन प्रायव्हेट लिमिटेड, ह.भ.प. बाळासाहेब बोडके, डॉ.ताराचंद कराळे, ह. भ .प .बोरकर महाराज ,उमेश धेंडे सीआयडी पुणे ,रोटरी क्लब निगडी, मावळ ,तळेगावचे सर्व सदस्य, वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन टीम महाराष्ट्र राज्य, आरोग्यदुत नवनाथ बोडके यांच्यासह इतर बोडके परिवाराचे स्नेही नातलग व मित्रपरिवार आणि  समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उद्योजक संदिप बंडु बोडके यांनी केले तर आभार प्रदर्शन भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब घोटकुले यांनी केले. सुत्रसंचलन पत्रकार प्रा. सोमनाथ नाढे यांनी केले .

आदर्श पत्रकार सन्मानाचे मानकरी : श्री. सुनील साहेबराव शिरसाट ( 5km News ), श्री. राकेश वसंतराव पगारे ( आवाज TV,  दैनिक आवाज,  सम्राट ) श्री. रमेश युवराज साठे ( उपसंपादक, स्वराज्य रक्षक न्यूज ),  श्री. विनय सोनवणे ( सांगावा न्यूज : संपादक ) श्री. देवा भालके ( चॅनलः महाराष्ट्र 18 News ) श्री. सिध्दांत चौधरी ( स्टार महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड संपर्क ९ ) श्री. प्रकाश प्रभाकर अनंत ( न्युज मराठी ) श्री. महावीर किसन जाधव ( महाराष्ट्र लोकधारा न्यूज ) , विलास कृष्णा भेगडे ( रिपोर्टर, तळेगाव दाभाडे ), सिता जगताप ( स्त्रीशक्ती  News ) , रेखा भेगडे ( सतर्क महाराष्ट्र न्युज चॅनेल ),  रेश्मा फडतरे ( महाराष्ट्र live ), पराग संतोष डिंगणकर ( पिपीसी न्यूज ),  श्री. राजु बबन वारभुवन ( victory Katta ), श्री. मुझफ्फर इनामदार ( वार्ता जगत न्यूज चैनल मुख्य संपादक ),  श्री. सचिन गोविंद ठाकर ( लोकमत प्रतिनिधी पवनानगर ), श्रावणी ( चित्रा ), धनंजय कामत ( क्राईम बॉर्डर ), प्रा. सोमराज सुभाष नाडे ( संपादक, स्वराज्य रक्षक न्यूज, पुणे ),  श्री. नितीन मधुकर कालेकर ( एन मराठी न्यूज ),  श्री. संतोष गोतावळे ( स्टार २४ न्युज मराठी ), श्री. विकास शामकांत बाजे ( दैनिक लोकमत ) श्री. बानेवार मारुती पिराजी ( राष्ट्रवार्ता न्यूज ), डॉ. मिलिंदराजे भोसले ( संपादक सद्रक्षणाय ), श्री. निलेश भाऊ ठाकर ,( प्रजावार्ता न्युज / प्रभात न्युज ), विलास भेगडे ( लोकमत) , उत्तम ठाकर ( दैनिक पुण्यनगरी) , सुभाष भोते ( दैनिक पुण्यनगरी ) , धनंजय नांगरे ( मुक्त पत्रकार ), विजय भुसारे ( पवना समाचारन), निलेश ठाकर ( दैनिक प्रभात - प्रजावार्ता ), महादेव वाघमारे ( मावळ 24 तास ) , ( अभिषेक बोडके प्रजावार्ता उपसंपादक ), गणेश गुरव ( पत्रकार सद्रक्षणाय )

या सर्व नामोल्लेख केलेल्यापैकी उपस्थित असलेल्या पत्रकारांना कार्यक्रमा दरम्यान आदर्श पत्रकार म्हणून शॉल आणि सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.









कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा