Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

शनिवार, २६ ऑक्टोबर, २०२४

चिंचवड विधानसभेत भाजपा आणि जगताप कुटुंबाची एकसंघ शक्ती दिसली प्रचारात

 


सांगावा न्युज, चिंचवड. दि. २६ : पिंपळे निळख वॉर्ड क्रमांक २६ मध्ये चिंचवड विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री शंकरशेठ जगताप यांच्यासाठी प्रचार दौरा करण्यात आला. सौ. ऐश्वर्या जगताप रेणुसे, वीरेन जगताप आणि प्रभागातील सर्वपक्षीय माजी नगरसेवक, पदाधिकारी तसेच सार्वजनिक मंडळांचे कार्यकर्ते व  महिला मंडळाचे सदस्य आणि स्थानिक नागरिक उत्साहाने सहभागी झाले होते.

आपण सर्वांनी मिळून एकजुटीने कार्य करीत श्री शंकरशेठ जगताप यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्याची भावना यावेळी प्रत्येकाची दिसून आली. यावेळी प्रचार दौऱ्या दरम्यान नागरिकांच्या पाठिंब्याने प्रचारात मोठा उत्साह दिसून आला. त्यामुळे विजयी वातावरणाची तयारी आतापासूनच सुरु असल्याचे चित्र उभे राहिले. या एकजुतीमुळे आगामी काळातही भाजपची आणि कुटुंबाची ताकद आणखीनच प्रभावीपणे दिसून येईल अशा भावना देखील नागरिक व्यक्त करीत आहेत. आपल्या प्रभगासह चिंचवड मतदार संघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वांनी मिळून शंकरशेठ जगताप यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा