भूम परांडा मदातर संघात राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार असतील डॉ. राहुल घुले
![]() |
| डॉ. राहुल घुले यांना पुष्प गुच्छ देवून अभिनंदन करतांना राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर साहेब |
सांगावा न्युज, भूम. दि. २६ : भूम - परांडा - वाशी मतदार संघातील निवडणूक तिरंगी होईल असे वाटत असताना आता ती चौरंगी होईल असे चिन्ह दिसत आहे. कारण प्रमुख दावेदार पक्ष असलेले शिवसेना - राष्ट्रवादी - आणि वंचित बहुजन आघाडीच्या स्पर्धेत राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून डॉ. राहुल घुले हे रिंगणात उतरले आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष श्री महादेव जानकर यांनी डॉ. राहुल घुले यांची उमेदवारी जाहीर केली.
डॉ. राहुल घुले यांच्या पाठीशी खात्रीचे मतदार आहेत त्यात आता राष्ट्रीय समाज पार्टीच्या मतांची भर पडल्यामुळे ते चांगली मते घेऊन विजयी होऊ शकतील अशी भावना डॉ. राहुल घुले यांनी सोशल मध्येमावर व्यक्त केली. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या समवेत उमेदवारी जाहीर झाल्याचे पत्र घेवून असलेला फोटो आज समाज मध्येमावर प्रसारित होताच विरोधी उमेदवारांना आता जास्त कसरत करावी लागणार हे नक्की.
" राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर साहेबांनी मला भूम परंडा वाशी विधानसभा ( 243 ) मतदार संघाचीची अधिकृत उमेदवारी दिल्याबद्दल त्यांचे मनापासून हार्दिक आभार मानतो. माझ्यासारख्या तरुण, सुशिक्षित ओबीसी उमेदवाराला अठरापगड जातीच नेतृत्व करण्याची संधी दिली. मी ओबीसी समाजाबरोबरच इतर सर्व समाजाला सोबत घेऊन ही विधानसभा 100% जिंकणार, याची मला खात्री आहे. विशेष सहकार्याबद्दल जिल्हाध्यक्ष श्री. विकास पाटील व श्री. नाना मदने यांचेही आभार"
_____ डॉ. राहुल घुले - उमेदवार (राष्ट्रीय समाज पक्ष ) : भूम - परांडा - वाशी मतदार संघ

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा