Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

रविवार, २७ ऑक्टोबर, २०२४

पिंपरी विधानसभा मतदार संघात ॲड. सागर अडागळे यांना वंचित बहुजन आघाडी कडून उमेदवारी जाहीर होण्याची दाट संकेत

 


सांगावा न्युज, पिंपरी दि. २७ : पिंपरी विधानसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडी कडून ॲड. सागर भाऊसाहेब अडागळे यांना पिंपरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता सूत्राच्या माहितीनुसार प्राप्त झाली आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यामध्ये प्रामुख्याने लढत दिसून येत आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी पक्षाचा मोठ्या संख्येने कार्यकर्ते नेते तसेच मोठा मतदार वर्ग तयार केला गेला आहे. त्यामुळे तेथील स्थानिक नागरिकांचा वंचित बहुजन आघाडीकडे असलेला कौल लक्षात घेता पिंपरी विधानसभेमधील युवा नेतृत्व म्हणून ॲड.सागर अडागळे यांची ओळख निर्माण झाली आहे. त्याचाच फायदा या विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीला मोठ्या प्रमाणात भेटू शकतो यासाठी. पिंपरी विधानसभेमध्ये तिरंगी लढत पाहिला मिळण्याची दाट शक्यता दिसून येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा