चिंचवड विधानसभेचे उमेदवार श्री नाना काटे यांना तरुणांचा वाढता प्रतिसाद
सांगावा न्युज, चिंचवड. दि. २५ : सध्या चिंचवड विधानसभेत प्रमुख प्रतिस्पर्धी पक्ष विजयाचे दावेदार म्हणून स्वतः ला सांगत असले तरी याच मतदार संघात श्री नाना काटे उमेदवार म्हणून उभे ठाकले असल्याने प्रमुख दावेदरांना मोठा धक्का बसला आहे. त्यातच नाना काटे यांनी मतदार संघातील जो नव मतदार आहे यांच्या समस्स्या जाणून घेण्यासाठी एक संपर्क क्रमांक सार्वजनिक केला असून त्यावर तरुण तरुणी प्रचंड प्रतिसाद देत आहेत. आतापर्यंत चिंचवड मतदार संघात केवळ तरुण नवं मतदार म्हणून त्यांच्यावर कुणी फोकस केलेले आढळत नाही. परंतु नाना काटे यांनी बरोबर तरुणांच्या भावना जाणून त्यांच्या अडी अडचणी जाणून घेण्याचे ठरवले. तसा थेट तरुणांशी संवाद साधता यावा म्हणून एक नंबर जारी केला आहे.
' मतदार संघातील युवक युवतींच्या सूचना मला सांगा ' अशा आशयाचे वाक्य लिहून 7517511112 हा संपर्क क्रमांक देवून आपल्या सूचना वॉट्सॲपवर पाठवण्याचे आवाहन श्री विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी केले आहे . त्यांच्या या आवाहनाला तरुण वर्गाने पसंती दर्शवली असून मोठा प्रतिसाद मिळत आहे .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा