Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

शुक्रवार, २५ ऑक्टोबर, २०२४

राबणाऱ्या लोकांना वाटतं आपला आधार प्रवीणदादा रणबागुल असणार !

 माय माऊल्यांचा आशीर्वाद प्रवीणदादांना देतात मोठी ताकद 

खेड्या पाड्यावर, गाव वस्तीवर माऊली माता भगिनी प्रवीणदादा रणबागुल यांचं औक्षण करून स्वागत करतांना 

सांगावा न्युज, भूम. दिनांक. २५ : गेली अनेक वर्षांपासून भूम - परांडा - वाशी मतदार संघावर सरंजामशाहीचे पुरस्कर्ते असलेले लोकप्रतिनिधिंचे वर्चस्व राहिलेले आहे. मतदार संघातील सामान्य लोकांच्या मते आपल्या मतदार संघाचा पाहिजे तसा विकास झालेला नाही. अनेक बाबतीत आपले तिन्ही तालुके मागासलेले आहेत पण दर वेळी आमदार होणारे सरंजामदार आपल्याच तोऱ्यात मिरवत राहिले आणि मतदारसंघ तसाच खितपत राहिला.  या सगळ्या गोष्टींची जान सुजाण नागरिकांना आहे. इतके दिवस या सुज्ञ नागरिकांकडे पर्याय नव्हता पण आता मात्र खमक्या निर्भिड पर्याय प्रवीणदादा रणबागुल यांच्या रूपाने भेटला आहे. आता संधी फक्त प्रवीणदादांनाच द्यायची अशी आण बहुसंख्य मतदारांनी घेतल्याचे चित्र भूम - परांडा - वाशीतील लोकांमध्ये दिसत आहे .

आज पक्ष पार्टीला आपलं मानणारा मतदार संभ्रमात आहे. शिव सेनेचा कट्टर मतदार कन्फ्युज आहे की शिव सेनेला मत द्यायचं पण नेमकं कुठल्या सेनेला ? तशीच अवस्था राष्ट्रवादीच्या कट्टर मतदारांची झाली आहे. राष्ट्रवादीचा कट्टर मतदार म्हणतो की राष्ट्रवादीला मत द्यायचं पण मग नेमकं कुठल्या राष्ट्रवादीला ? हा प्रश्न मतदारांसमोर पडलेला असतानाच. कट्टर मतदाराची भावना अशी झाली आहे की काल आपल्याला जो विचार आवडला नव्हता, ज्याला आपण वाईट बोललो, प्रसंगी शिव्या घातल्या त्याच विरुद्ध विचारी पार्टीची लोकं आपल्या नेत्याच्या मांडीला मांडी लावून निवडणूक लाडवत आहेत. मग आपला प्युवर वैचारिक आधार इथे धुळीला मिळवला जात आहे. हे मतदारांनी लक्षात ठेवले आहे. आपल्या मताची खिचडी होऊ नये म्हणून आज मदातरांसमोर सक्षम पर्याय उभा आहे तो म्हणजे श्री प्रवीणदादा रणबागुल यांच्या रूपाने. आत्तापर्यंत सगळ्या पक्षांना आपल्या मतदार संघात आमदारकीची संधी दिली पण त्यांनी मनासारखे कार्य केले नाही. म्हणून आता वंचित बहुजन आघाडीला यंदा भूम परांडा वाशी मतदार संघातून संधी दिली पाहिजे अशी अनेक मतदारांची भावना आहे.

सामान्य कुटुंबातील एक सुशिक्षित व्यक्तिमत्त्व असलेले आणि सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र घेवून यशाच्या वाटेवर घेवून जाणारे प्रवीणदादा रणबागुल हे एकमेव उमेदवार लोकांच्या पसंतीस उतरत आहेत. हिंदू मुस्लिम बांधवांसह इतर विविध जाती धर्मातील लोकांना वंचित बहुजन आघाडीची समाज उपयोगी विचारधारा पटवून दिली. त्यामुळेच बहुसंख्य लोकांनी आणि कार्यकर्त्यांनी प्रवीणदादांवर विश्वास दाखवत वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला. प्रवीणदादांच्या कार्याचा आवाका लक्षात घेता हे व्यक्तिमत्त्व आपल्यासाठी काय करू शकते याचा अंदाज मतदारांना आला आहे. त्यामुळेच वाड्या, वस्त्यावर, शेतावर राहणारी गोरगरीब जनता प्रवीणदादांचे मनपूर्वक स्वागत करीत आहेत. आशीर्वाद देत आहेत. या गोर गरीब कष्टकऱ्यांची, शेतकऱ्यांची साथ प्रवीणदादा रणबागुल यांना आहे असे वातावरण मतदार संघात दिसून येत आहे.

भूम - परांडा - वाशी मतदार संघातील लोकांची आस मला विधानसभा निवडणुकीत पास करेल असा विश्वास व्यक्त करून मला गावो-गावी मिळत असलेला सन्मान हाच लाख मोलाचा आहे, याची सर्वांची जाणीव ठेऊन येणाऱ्या काळात सर्वांचे प्रश्न सोडवणार असे मत श्री प्रवीणदादा रणबागुल यांनी व्यक्त केले.











कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा