Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

मंगळवार, २९ ऑक्टोबर, २०२४

प्रचंड जन समुदायाच्या उपस्थितीत अण्णा बनसोडे यांचा पिंपरी विधानसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल

 

"सोबत असलेल्या लोकांची गर्दी पाहून, माझ्या महाविजयाची नांदीच आहे असं वाटतंय" ___ अण्णा बनसोडे



 सांगावा, पिंपरी. दि. २९ : उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दोन दिवसांत विविध पक्ष आणि संघटनाच्या उमेदवारांमध्ये चालू असलेल्या झुंबड गर्दीमध्ये पिंपरी मतदार संघावर प्रमुख दावेदार असलेले आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री अण्णा हजारे यांनी २८ तारखेला आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शहरातील महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

" खंबीर साथ जनतेची, नांदी ऐतिहासिक महाविजयाची " या शीर्षकाखाली आज आणा बनसोडे यांनी आपल्या भावना व्यक्त सोशल मध्येमंवर पोस्ट करीत व्यक्त केल्या. 

" दिनांक सोमवार २८ ऑक्टोबर रोजी अथांग जनसागराच्या साक्षीने पिंपरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस व महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. यानिमित्ताने आयोजित भव्य नामांकन रॅलीस व महाविजय संकल्प सभेस लोटलेला अलोट जनसागर, जनतेचे उदंड प्रेम व अभूतपूर्व उत्साह पाहून मी अक्षरशः भारावून गेलो. जणू ही मी केलेल्या विकासकामांची पावती व ऐतिहासिक महाविजयाची नांदीच होती. या ऐतेहासिक क्षणी नागरिकांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहून भरभरून प्रेम, आशीर्वाद , पाठिंबा दिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. नेहमी स्नेह असाच कायम ठेवून आपण सर्वांनी खंबीर साथ द्यावी, आपल्या सर्वांच्या आशीर्वाद आणि पाठबळावर पिंपरी मतदारसंघात प्रगतीचे पर्व आणून जनतेच्या विकासासाठी कायम कटिबद्ध आहे" __________ अण्णा बनसोडे ( महायुतीचे उमेदवार : पिंपरी विधानसभा मतदारसंघ )

Advertisement 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा