कोणतेही गर्दी न करता, सामान्य लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घेत शांततेत उमेदवारी अर्ज दाखल
![]() |
| भूम तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करतांना श्री प्रवीण रणबागुल व सामान्य मतदार आणि कार्यकर्ते |
सांगावा न्युज, भूम. दि. २८ : भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदार संघातून निवडणूक रिंगणात उतरत वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री प्रवीण रणबागुल यांनी मोजके कार्यकर्ते आणि सामान्य मतदारांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज भूम तहसील कार्यालयात दाखल केला.
आज सकाळी दहा वाजता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भूम शहराच्या मुख्य चौकातून कार्यकर्त्यांसह उत्साहात पायी चालत वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रविण (दादा) रणबागूल तहसील कार्यालयात दाखल झाले. वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या साथीनं साधेपणाने उमेदवारी अर्ज भरला. हा क्षण केवळ उमेदवारीचा नव्हे, तर जनतेशी नाळ जुळवण्याचा आणि त्यांच्या समस्यांसाठी लढण्याचा संकल्पही दृढ करणारा ठरला अशा भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. मतदार संघात वंचित बहुजन आघाडीची मोठी ताकद असून यंदाची निवडणूक खूप चुरशीची होईल असे वातावरण आहे.
![]() |
| Advertisement |


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा