Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

सोमवार, २८ ऑक्टोबर, २०२४

डॉ. राहुल घुले यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल

 "भूम परांडा मतदार संघाचा कायापालट करणार" ___ डॉ. राहुल घुले 

भूम तहसील कार्यालय येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतांना डॉ. राहुल घुले सोबत पदाधिकारी व कार्यकर्ते 

सांगावा न्युज, भूम. दि. २८ : भूम परांडा वाशी विधानसभा मतदार संघातून राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ. राहुल घुले यांनी वाजत गाजत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी विविध समाजाचे सामान्य लोकं, कार्यकर्ते आणि पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते .

"आता खरी सर्वसामान्य जनतेसाठी लढाई सुरू झाली. महाराष्ट्राला हेवा वाटेल असा भूम परांडा वाशी मतदार संघ घडवणारच " अशी भावना डॉ. राहुल घुले यांनी यावेळी व्यक्त केली . 

डॉ राहुल घुले यांच्या पाठीशी हक्काचे मतदार म्हणून समजाबंधव पाठीशी आहेत. शिवाय विविध समाज घटकांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध हे देखील एकजुटीने त्यांच्या सोबत असल्याचे चित्र यावेळी निदर्शनास आले. जमेची बाजू म्हणजे मतदार संघात राष्ट्रीय समाज पक्षाच्या मतदारांची संख्या देखील चांगली आहे. त्यामुळे डॉ राहुल घुले हे भूम परांडा वाशी मतदार संघातून चांगली टक्कर देतील अशी चर्चा सामान्य लोकांमध्ये सुरू आहे.

Advertisement 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा