Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

सोमवार, २८ ऑक्टोबर, २०२४

राणी गदडे यांनी जिव्हाळा बालसंगोपन गृहातील मुलांना मिठाई वाटप करून केली दिवाळी साजरी

 


सांगावा न्युज, पिंपरी चिंचवड. दि. २८ : युवा समाजसेविका राणी गडदे यांनी काळेवाडी येथील जिव्हाळा बालसंगोपन गृहाला भेट देवून दिवाळी उत्सवाचा पहिला दिवस साजरा केला. यावेळी मुलांना मिठाईचे वाटप वाटप करण्यात आले. दर वर्षी आपण आपल्या घरी गोड गोड पदार्थ करून आपली दिवाळी गोड करतो. परंतु समाजातील वंचित मुलांचा जे सांभाळ करतात. त्यांना शिक्षण आणि त्यांचे पालनपोषण करतात अशा बाल संगोपण गृहात आपण दिवाळी साजरी केली पाहिजे आणि मुलांच्या अनंदात आपणही सहभागी झाले पाहिजे अशी भावना घेवून आज दिवाळीचा पहिला दिवस या मुला मुलींसोबत साजरा करावा असे वाटले. म्हणून मी इथे येवून या मुलांचे तोंड गोड केले अशी भावना यावेळी राणी गडदे यांनी व्यक्त केली. याप्रसंगी जिव्हाळा बालसंगोपन गृहाचे संस्थापक श्री विकास पाटोळे आणि अध्यक्षा सौ. वंदना पाटोळे हे उपस्थित होते. त्याच बरोबर सिने दिग्दर्शक रामकुमार शेडगे पत्रकार विनय सोनवणे उपस्थित होते. विकास पाटोळे यांनी आलेल्या पाहुण्यांचे मनपूर्वक आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा