Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

मंगळवार, २९ ऑक्टोबर, २०२४

अलोट जनसमुदायाच्या गर्दीत रॅली काढून शंकरशेठ जगताप यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

 उपस्थित जनसमुदाय सांगून जातो की माझा विजय आजच निश्चित झाला ____ शंकरशेठ जगताप 

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री शंकरशेठ जगताप आपला उमेदवारी अर्ज दखल करतांना, सोबत उपस्थित लोकप्रतिनिधी व मान्यवर 

सांगावा न्युज, चिंचवड. दि. २९ : पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड विधानसभा मतदार संघातून श्री शंकरशेठ जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

खासदार श्रीरंग बारणे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ, माजी खासदार अमरजी साबळे, आमदार अश्र्विनिताई जगताप, उमाताई खापरे अमित गोरखे यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येने उपस्थित जनतेच्या उस्पूर्त प्रतिसादात दिनांक २८ ऑक्टोबर रोजी चिंचवड विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री शंकरशेठ जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

"उमेदवारी अर्ज दाखल करतांना आमच्या पाठीशी लोकांची असलेली हजारोंच्या संख्येत अलोट गर्दी सांगून जाते की आम्ही आज विजयी ठरत आहोत. येत्या २३ तारखेला पिंपरी चिंचवड शहरातील महायुतीचे तिन्ही उमेदवार विजयी झालेले दिसतील"

_____ शंकरशेठ जगताप ( चिंचवड विधानसभा : महायुतीचे उमेदवार )

Advertisement 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा