Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

मंगळवार, २९ ऑक्टोबर, २०२४

नाना काटे यांचा चिंचवड विधानसभेतून अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल

 "रॅली मध्ये माता भगिनींनी केलेले औक्षण, दिलेल्या शुभेच्छा, आशीर्वाद माझ्या निवडणूक कार्यात बळ देणाऱ्या आहेत" ____ नाना काटे 

श्री नाना काटे चिंचवड विधानसभा मतदार संघातून आपला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करतांना सोबत कार्यकर्ते पदाधिकारी 

सांगावा न्युज, चिंचवड. दि. २९ : आपल्याला पक्षाचे तिकीट मिळेल ही खात्री असल्यामुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून आपण निवडणूक रिंगणात उतरणार आहोत अशी जय्यत तयारी करणारे श्री नाना काटे यांनी शेवटी आज आपला उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून दाखल केला. आपलं तिकीट हे अनपेक्षितपणे हुकलं असल तरी आपली तयारी आणि आपल्या हक्काच्या मतदारांशी असलेला आपला स्नेह कायम ठेवण्यासाठी नाना काटे यांना अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरावे लागले असावे अशी चर्चा सामान्य लोकांमध्ये ऐकायला मिळते आहे. तर आपण आपण निवडणूक लढतोय हे जिंकण्यासाठीच असा विश्वास श्री नाना काटे यांना वाटत आहे.

"आज महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 च्या निमित्ताने चिंचवड विधानसभेसाठी शंभु महादेव तसेच अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास वंदन करून आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शंभो महादेव मंदिरापासून सुरुवात झालेल्या रॅली मध्ये माता भगिनींनी केलेले औक्षण आणि दिलेल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद माझ्या निवडणूक कार्यात नक्कीच बळ देणाऱ्या ठरतील. यावेळी मतदारसंघातील माता भगिनी,माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे आणि माझा भक्कम आधारस्तंभ असणारे माझे असंख्य कार्यकर्ते,विविध गावातील ग्रामस्थ तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते "

______ नाना काटे 

Advertisement 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा