दिनांक १३ नोव्हेंबर २०२४ रोजी, दुपारी ३. वाजता. स्थळ : नगरपालिका समोर, भूम.
सांगावा न्युज, भूम. दि. १२ : राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार डॉ. राहुल घेले यांनी भूम परांडा वाशी मतदार संघात जोरदार प्रचार करीत आघाडी घेतली आहे. प्रचार मध्यावर आला असून शिगेला पोहचण्या अगोदरच मतदार संघातील विविध संस्था संघटना पाठिंबा देत असल्याचे चित्र आहे. डॉ. राहुल घुले यांच्या प्रचार सभेसाठी ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
दिनांक १३ नोव्हेंबर २०२४ रोजी, दुपारी ३. वाजता नगरपालिका समोर, भूम येथे होणाऱ्या या सभेला जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होण्याचे आवाहन डॉ राहुल घुले यांनी केले आहे. शिट्टी हे निवडणूक चिन्ह घेवून रिंगणात उतरलेले डॉ राहुल घुले यांनी रेसमधील उमेदवारांना घाम फोडला असल्याचे वातावरण मतदार संघात दिसत आहे.
![]() |
| Advertisement |


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा