मेळाव्यानिमित्त संवाद आणि जेष्ठ नागरिकांचे आशीर्वाद !
सांगावा न्युज, चिंचवड. दि. ११ : चिंचवड विधानसभा मतदरसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्री राहुल कलाटे यांची ज्येष्ठ नागरिक संघाच्या मेळाव्याला प्रमुख उपस्थिती होती. पिंपळे सौदागर याठिकाणी मेळाव्याचे आयोजन केले होते. प्रचारा दरम्यान सर्वच स्तरातील लोकांपर्यंत पोहचून आपण आपल्या मतदार संघात काय काय विकास करू शकतो हे पटवून देण्यावर श्री कलाटे यांचा भर दिसला.
''जेष्ठ नागरिक संघाच्या १५ व्या वार्षिक मेळाव्यानिमित्त पिंपळे सौदागर येथे उपस्थित राहून संघाच्या पदाधिकारी, मान्यवर आणि सभासदांशी संवाद साधला. संघाच्या कार्याचे कौतुक करीत सदिच्छा दिल्या. मेळाव्याला संबोधित करीत जेष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेतले.यावेळी सर्वांनी आपल्याला विधानसभा निवडणूकीसाठी शुभेच्छा व्यक्त करीत आपण नव्या चिंचवडचे शिल्पकार बनू, असा आशीर्वाद दिला" __ राहुल कलाटे ( महाविकास आघाडीचे उमेदवार : चिंचवड मतदारसंघ )

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा