Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

शनिवार, २८ डिसेंबर, २०२४

आळंदी येथे आयकॉन क्लासेसचा पालक मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न

 


| सांगावा न्यूज | आळंदी, दिनांक २२ डिसेंबर २०२४ रोजी आनंद मंगल कार्यालय, आळंदी येथे आयकॉन क्लासेसच्या वतीने बारावीच्या (सायन्स ) वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला सुमारे ३०० पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.  

कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन दीपाली मॅडम यांनी केले. उद्घाटन सत्रात एस.एम. जोशी सरांनी विद्यार्थ्यांना नीट आणि सीईटी परीक्षांसाठी योग्य तयारीबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर, आयकॉन क्लासेसचे प्रमुख प्रा. हरीश जगताप सर यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी उपयुक्त तंत्रे आणि अभ्यास पद्धतींबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांमध्ये शिस्तबद्धता आणि अभ्यासाविषयी गंभीरता निर्माण करण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांकडून शपथही घेतली. बारावीच्या बोर्ड परीक्षेत विद्यार्थ्यांना चांगले यश मिळावे व विद्यार्थ्यानी अभ्यासाचे नियोजन कसे करावे याबद्दल क्लासेसचे संचालक हरिष सर जगताप यांनी मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. तसेच, बोर्ड च्या परीक्षेनंतर नीट, सिईटी, जेईई या परीक्षेची तयारी करण्यासाठी दोन महिन्यासाठी क्रॅश कोर्स घेणार असल्याची माहिती हरिष सरांनी दिली.

पालक आणि विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन मिळावे, यासाठी अनुभवी शिक्षकांची विशेष नियोजनपूर्वक व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये उपस्थित सर्व पालक आणि विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. या पालक मिटिंग मध्ये माधुरी मॅडम, निकिता मॅडम, आवाड सर, ओतारी सर व काळे सर सर्वांनी पालकांना व विद्यार्थ्यांना वयक्तिक भेटून खूप मोलाचे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयकॉन क्लासेसच्या प्रशासनिक टीमने परिश्रम घेतले. शेवटी, प्रा. हरीश जगताप सरांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले आणि कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा