Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

गुरुवार, २६ डिसेंबर, २०२४

सनय छत्रपती शासन पक्षाच्या राज्य संघटक पदी रमेश साठे यांची निवड

 


| सांगावा न्यूज | पुणे. दिनांक २६ : आगामी काळातील राजकीय आखाड्यात अस्तित्व दाखवण्यासाठी सनय छत्रपती शासन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नामदेव जाधव यांनी आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करणे सुरू केले आहे. मुळशी तालुक्यातील मान येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार रमेश साठे यांची सनय छत्रपती शासन या पक्षाच्या महाराष्ट्र राज्य संघटक पदी निवड करण्यात आली. तसे नीवड झाल्याचे पत्र स्वतः नामदेव जाधव यांनी रमेश साठे यांच्याकडे सुपूर्द करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी स्वराज्य रक्षक न्यूजचे संपादक सोमनाथ नादे उपस्थित होते.

"माझी सनय छत्रपती शासन या पक्षाच्या महाराष्ट्र राज्य संघटक पदी सनय छत्रपती शासन पक्ष महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय संस्थापक मा. प्रा. नामदेवराव जाधव साहेब यांच्या मान्यतेने नियुक्ती करण्यात आलेली आहे. पक्षाध्यक्ष प्रा. नामदेवराव जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेतून पुढील काळात सनय छत्रपती शासन पक्षाच्या माध्यमातून युवकांसाठी रोजगार निर्मिती,गडसंवर्धन, शिव संस्कार, उद्योजकता, रोजगार ,आरोग्य तसेच बेकारीमुक्त ,कर्जमुक्त, घराणेशाही मुक्त महाराष्ट्र उभा करण्यासाठी भरिव कामगिरी करण्याची व सनय छत्रपती शासन पक्षाचे महाराष्ट्रभर संघटन मजबूत करण्याचे वचन देतो. अशाप्रकारे सनय छत्रपती शासन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. नामदेवराव जाधव साहेब यांनी माझ्यावरती जो विश्वास दाखविला तो सार्थ ठरविण्यासाठी मी प्रचंड मेहनत घेऊन अखंडपणे पक्ष मजबुतीसाठी कार्यरत राहणार त्याचप्रमाणे माझ्याकडून कोणत्याही प्रकारचे पक्षाविरोधी कृत्य अथवा असंविधानिक काम होणार नाही तर पक्षाचे ध्येय व धोरणाना अनुसरून प्रत्येक कृती असेल "

रमेश साठे ( राज्य संघटक : सनय छत्रपती शासन पक्ष )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा