भटक्या कुत्र्यांवर योग्य कार्यवाही करण्या संदर्भात मा. नगरसेवक अभिषेक बारणे यांचे क्षेत्रीय अधिकाऱ्याला पत्र
सांगाव न्युज, थेरगाव. दि. ३ : पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव मध्ये गेल्या वर्षभरापासून मोकाट कुत्र्यांनी हैदोस माजवला असून या संदर्भात सांगावा न्युज वर वारंवार बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. तरीदेखील संबंधित प्रशासनाने आजतागायत दखल घेतलेली नसून, मोकाट कुत्र्यांचा वाढता वावर हा सामान्य नागरिकांच्या आणि शाळकरी मला मुलींच्या जिवाला धोका ठरत आहे. त्यातच काही पिसाळलेली कुत्री परिसरात आढळल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. अशा मोकाट कुत्र्यांची योग्य विल्लेवाट लावावी म्हणुन थेरगाव परिसरातील नागरिकांनी स्थानिक नगरसेवकांच्या कार्यालयात जावून तक्रारी दाखल करायला सुरुवात केली आहे. काल दिनांक २ डिसेंबर रोजी थेरगाव येथील स्थानिक मा. नगरसेवक अभिषेक बारणे यांनी ग प्रभाग क्षेत्रीय अधिकारी यांना लेखी पत्र लिहून भटक्या मोकाट कुत्र्यांची व्यवस्था करण्या संदर्भात कळवले आहे.
पूर्वी सांगावा न्यूजवर आलेली बातमीमहानगर पालिकेच्या नागूभाऊ गतिराम बारणे शाळा गेट समोरील परिसर , संचेती शाळा परिसर, राणुबई बारणे शाळा परिसर, साईनाथ नगर, अशोका सोसायटी रस्ता - संभाजी नगर, वनदेव नगर, क्रांतीवीर नगर इत्यादी परिसरात मोकाट कुत्र्यांच्या झुंडी च्या झुंडी आढळून येत आहेत. कधी कधी ही कुत्री वाटसरू नागरिकांच्या व शाळकरी विद्यार्थ्यांच्या अंगावर धावून जातात. दुचाकीवर व चारचाकी वाहनाने प्रवास करणाऱ्यांच्या अंगावर देखील कुत्री धावून जातात. त्याने अपघात देखील घडत आहेत. अशी कुत्री लोकांना आणि विद्यार्थ्यांना चावली तर इजा तर होतेच शिवाय रेबीज सारख्या गंभीर आजार होण्याच्या धोक्यामुळे लोकं मोकाट कुत्र्यांच्या दहशतीखाली वावरत असल्याचे चित्र थेरगाव परिसरामध्ये दिसून येत आहे. स्थानिक नगरसेवक श्री अभिषेक बारणे यांनी लेखी पत्र लिहून भटक्या कुत्र्याची वील्लेवाट लावावी व नागरिकांची अशा मोकाट कुत्र्यांच्या त्रासापासून सुटका करावी अशा सूचना ग क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. वेळीच प्रशासनाने कार्यवाही करावी अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे ." माझ्या प्रभाग क्रमांक. २३ थेरगाव मधील अनेक सोसायटी, गल्ली मध्ये मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे नागरिकांवर, लहान मुलांवर कुत्र्यांचे हल्ले होत आहेत. परिणामी लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरीकांच्या अनेक तक्रारी माझ्या जनसंपर्क कार्यालयामध्ये येत आहेत. तरी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना विनंती करतो की, आपण सदर विभागास सांगून त्वरित मोकाट कुत्र्यांची व्यवस्था करावी "___ मा. नगरसेवक : अभिषेक बारणे


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा