Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

मंगळवार, ३ डिसेंबर, २०२४

आमदार शंकर जगताप यांचा पोलीस आयुक्तांकडून सत्कार

 पोलिस प्रशासनाचे कार्य आणि त्याग याविषयी आपल्याला अभिमान __ शंकर जगताप ( आमदार )


सांगावा न्युज, पिंपरी चिंचवड. दि. ३ : चिंचवड विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री शंकर जगताप यांनी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चोबे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी श्री चोबे यांनी श्री जगताप यांचे विजयाबद्गल अभिनंदन करून पुष्पगुच्छ व शॉल देवून सत्कार केला. 

" पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त मा. विनयकुमार चोबेजी यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी माझ्या विजयाबद्दल त्यांनी माझे अभिनंदन केले आणि आगामी काळातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. आम्ही विविध सामाजिक, प्रशासनिक आणि पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांवर चर्चा केली. यावेळी शहराच्या सुरक्षिततेसाठी आणि नागरिकांच्या कल्याणासाठी असलेल्या उपाययोजनांवर सखोल विचारविनिमय झाला.  तसेच, पोलिस प्रशासनाचे कार्य आणि त्याग याविषयी अभिमान व्यक्त केला. भविष्यात, शहराच्या विकासासाठी आणि सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने काम करण्याचा संकल्प केला "

___ शंकर जगताप ( आमदार : चिंचवड )




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा