Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

बुधवार, ४ डिसेंबर, २०२४

राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार जहीर पटेल यांना जाहीर

 कला क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार देवून जहीर पटेल यांचा सन्मान


सांगावा न्युज, पुणे. दि. ४ : कला व सांस्कृतिक क्षेत्रात दैदिप्यमान कार्य घडावे यासाठी जहीर पटेल यांनी गेल्या काही वर्षातील केलेले कला विश्वातील कार्य सातत्यपूर्ण आणि उत्कृष्ट झाले आहे. या कामगिरीची दखल घेऊन , साऊ ज्योती सामाजिक फाउंडेशन महाराष्ट्र राज्य तसेच सर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने श्री पटेल यांच्या कार्य कर्तुत्वाला प्रोत्साहित करण्याचे कार्य करीतराज्यस्तरीय आदर्श पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. येत्या ८ डिसेंबर रोजी गंज पेठ पुणे येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न होणार आहे. 

श्री जहीर पटेल यांनी नवीन कलाकारांना प्रशिक्षण देणे त्यांची राहणे खाणे व्यवस्था करणे तसेच कलाकारांना रंगमंच उपलब्ध करून संधी देणे असे कार्य केले आहे. 

आजपर्यंत शेकडो कलाकार ताज एंटरटेनमेंटच्या मध्येमातून प्रशिक्षित झाले आहेत. कला क्षेत्रातील नाटक, सिनेमा, टीव्ही मालिका तसेच युट्यूब मध्येमामध्ये प्रशिक्षित कलाकार कार्यरत आहेत .

" पुरस्कार प्रेरणा देतात. प्रेरणेने राष्ट्र मोठे होते ! या सूत्रावर आधारित , राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार कार्य प्रति आपणास प्रोत्साहित करण्याच्या हेतूने, आपणास आम्ही वरील फाउंडेशनच्या माध्यमातून २०२४. करिता पुरस्कार जाहीर करीत आहोत. तसेच भावी वाटचालीसाठी शुभेच्छा..! आपणास तरी आपण या समारोह प्रसंगी आपण आपल्या सहकुटुंब व मित्र परिवारासह सोबत उपस्थित राहुन सदर कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती "

__ साऊ ज्योती सामाजिक फाऊंडेशन व सर्च फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा