Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

बुधवार, ४ डिसेंबर, २०२४

थेरगाव हाॅस्पीटल मध्ये  पत्रकार व कुटुंबीयांसाठी आरोग्य शिबिर संपन्न

 मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबिरास उत्तम प्रतिसाद 


सांगावा न्युज, थेरगाव. दि. ४ : आज स्पर्धेच्या आणि धकाधकीच्या जीवन शैलीत पत्रकार बंधू भगिनी २४/७ कार्यरत राहुन गल्ली ते दिल्ली सह जगभरातील घडामोडींची माहिती बातमी स्वरूपात लोकांपर्यंत पोहचवत असतात. पत्रकारांनी अहोरात्र कार्य केल्यामुळे त्याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. गेली ८५ वर्षापासून ' मराठी पत्रकार परिषदे पत्रकारांच्या सर्वांगीण हितासाठी कार्यरतआहे. ' ३ डिसेंबर वर्धापन दिनानिमित्त दर वर्षी पत्रकार आणि कुटुंबीयांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर व औषेधोचार केला जातो. यंदाचे हे ८६ वे वर्ष. काल ३ जानेवारी मराठी पत्रकार परिषद वर्धापन दीन संपन्न झाला. त्या निमित्ताने आज दिनांक ४ डिसेंबर २०२४ रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नवीन थेरगाव हॉस्पिटल येथे आरोग्य शिबिर संपन्न झाले. यावेळी पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांनी उत्तम प्रतिसाद देत सहभाग घेतला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आरोग्य शिबिराचे उद्घाटन रुग्णालय प्रमुख डॉ राजेंद्र फिरके आणि मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त श्री शरद पाबळे यांच्या हस्ते झाले. परिषदेचे विभागीय अध्यक्ष श्री गणेश मोकाशी आणि जिल्हा संघटक व पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री अनिल वडघुले यांनी महाराजांच्या प्रतीमेस पुष्प अर्पण केले. यावेळी नवीन थेरगाव हॉस्पिटल चे डॉक्टर्स , नर्स , तसेच सहाय्यक स्टाफ उपस्थित होते. थेरगाव हॉस्पिटल स्टाफ सह पत्रकार सागर सूर्यवंशी, संतोष गोतावळे, विनय सोनवणे, रामकुमार शेडगे, पराग डिंगणकर, मारुती बानेवार, प्रसाद वडघुले, डॉ. शेलार,  रमेश साठे इत्यादी पत्रकारांनी आरोग्य शिबिराच्या आयोजनात सहकार्य केले. थेरगाव हॉस्पिटल स्टाफ कडून आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार व्यवस्था केल्याने पत्रकार व कुटुंबीयांना त्याचा लाभ झाला.
राज्यातील समस्त मराठी पत्रकारांच्या स्वाभिमान आणि न्याय हक्कासाठी लढा उभारणाऱ्या मराठी पत्रकार परिषद मुंबईच्या ८६ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून राज्यभरात पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्याचे निर्देश पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख,राज्य अध्यक्ष मिलींद आष्टीवकर, विश्वस्त शरद पाबळे, जिल्हा अध्यक्ष सुनिल लोणकर यांनी निर्देश केले. त्यानुसार पिंपरी-चिंचवड मधे बुधवार दि ४ डिसेंबर २०२४ रोजी थेरगाव येथील हाॅस्पीटल येथे पत्रकार व कुटुंबीयांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी ५५ पत्रकार व कुटुंबीयांनी शिबिरात विविध प्रकारच्या शारीरिक तपासण्या करून घेतल्या. 

या प्रसंगी रुग्णालय प्रमुख डॉ राजेंद्र फिरके, जेष्ठ वैद्यकिय अधिकारी. लक्ष्मीकांत आत्रे, डाॅ रवींद्र मंडपे, डाॅ विकास ईसाळकर, फिजिशियन डाॅ अमित दरिरा, डाॅ प्रितम सांगडे, स्त्री रोग तज्ज्ञ व सर्व कर्मचारीवर्ग, यांनी शिबिरासाठी मोलाचे योगदान दिले. संघटनेच्या सर्व सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा