सांगावा न्युज, मुंबई. दि. ४ : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळविलेल्या महायुतीने आज राज्याची राजधानी मुंबईत राजभवन येथे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्याकडे महायुतीच्या वतीनं सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला. भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाइं व महायुतीच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला समर्थन देणारे पत्र राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांना सुपूर्द करण्यात आले.
यावेळी भाजपचे केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, विजय रूपानी, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, अशोकराव चव्हाण, रावसाहेब दानवे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर यांसह महायुतीतील इतर प्रमुख नेते व आमदार उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा