सांगावा न्युज, पुणे. दि. ५ : सरकार म्हणून महाराष्ट्र राज्याची सूत्रे आजपासून महायुतीच्या हातात गेली. आज दिनांक ५ डिसेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र राज्याचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. नंबर दोन चे खाते असलेले गृह खाते आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पराकोटीचे प्रयत्न केले. शेवटी एकनाथ शिंदे हे सरकारमध्ये सहभागी होतील की नाही हा आज पर्यंत राज्यातील जनतेला पडलेला प्रश्न होता. शेवटी नाही होय करीत आज एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यामुळे शिवसेनेतील कार्यकर्ते, पदाधिकारी , आमदार , खासदार यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर शुभे्छांचा वर्षाव केला आहे. शिरूर चे माजी खासदार शिवजीराव आढळराव पाटील यांनी देखील शिंदे साहेबांना शुभेच्छा देवून समाज मध्येमांवर आपल्या भावना व्यक्त केल्या.
" मा. श्री. एकनाथ शिंदे साहेब यांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! आपल्या ठाम नेतृत्वाने आणि कष्टाळू वृत्तीने महाराष्ट्राच्या प्रगतीला नवी दिशा मिळेल, याची खात्री आहे. आपल्या कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! "
____शिवाजीराव आढळराव पाटील ( माजी खासदार )

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा