Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

शुक्रवार, ६ डिसेंबर, २०२४

महापरिनिर्वाण : आजही सर्वांच्या न्याय हक्कांसाठी निर्भिडपणे उभा असलेले एकमेव भारतीय ' अमर ' व्यक्तिमत्त्व

 देश विकासासाठी, समाज उद्धारासाठी, कायदा - शेती - जल - अर्थ - समाज - संस्कृती - उद्योग - कामगार आणि शिक्षण क्षेत्रातील कार्याने डॉ बाबासाहेब आंबेडकर आजही आपल्या सोबत जिवंत आहेत !


सांगावा न्युज, पुणे. दि. ६ डिसेंबर २०२४ : भारतीय समाज व्यवस्थेतील उच नीचतेच्या थराला सुरुंग लावून चातुरवर्ण व्यवस्था उद्ध्वस्त करून सर्व धर्मीय समाजाला समान न्याय व ते हक्क मिळवून देणारे एकमेव अद्वितीय महापुरुष म्हणजे डॉ. बाबसाहेब आंबेडकर. आज ६ डिसेंबर बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन. सांगावा न्युज परिवारातर्फे मनपूर्वक श्रद्धांजली व्यक्त करून महामानवाला विनम्र अभिवादन.

खरं म्हणजे शुर महापराक्रमी महामानवांचा कधी अंत होत नसतो ना कधी मृत्यू. त्यांचा महापरिनिर्वाण होतो म्हणजे ते आपल्याला आणि जगाला सोडून गेले का तर असेही नाही. जयंती असो की महापरिनिर्वाण आपण डॉ बाबासाहेब आंबेडकरांना आठवतो. जयंती साजरी करीत असताना त्यांच्या विचारांना उजाळा देतो. तेव्हा लोकं प्रचंड संख्येमध्ये एकत्र उपस्थित राहून थेट बाबासाहेबांशी संवादच साधत असतात. महापरिनिर्वाण दिनी दाटलेल्या कंठाने बाबासाहेबांना विनम्र अभिवादन आपण करतो. प्रत्येक वेळी इलेक्शन आले किंवा कुठल्या सामाजिक किंवा कार्यालयीन कार्यक्रमात कुणी भाषण करीत असेल तरी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना आठवून म्हणतो की, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो मतदानाचा हक्क दिला आहे त्याने आपण सामान्य लोकं या आपल्या भारत देशाचे मालक झालो आहोत. या देशाला बाबासाहेबांनी जगाला हेवा वाटावा अशी आदर्शवत लोकशाही दिली. असंख्य जाती धर्मात आणि चाली रीतिरिवाज परंपरांमध्ये विखुरलेल्या भारतीय समाजाला संविधानाने एकत्र आणले आणि आपण सर्व केवळ भारतीय म्हणुन एक आहोत हे सिद्ध करून दाखवले. 
आपल्या दैनंदिन जीवनात वावरत असताना महापुरुषांच्या कार्याची आठवण पाउलो पावली येत असतेच. देश विकासासाठी, समाज उद्धारासाठी, कायदा - शेती - जल - अर्थ - समाज - संस्कृती - उद्योग - कामगार आणि शिक्षण क्षेत्रातील डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या भरीव कामगिरीचा इतिहास पुस्तकांच्या पानांवर वर्तमानात आपण वाचतो आहोत. पुस्तकातून, स्मारकातून, अडचणीच्या वेळी कायद्याची मदत म्हणून, शैक्षणिक पठ्यक्रमातून आणि तुमच्या आमच्या मनातून आपण सतत बाबासाहेबांसोबत संवाद साधत असतो. म्हणून म्हणावसं वाटतं की शुर महापराक्रमी महामानवांचा कधी अंत होत नसतो ना कधी मृत्यू. त्यांचा महापरिनिर्वाण होतो म्हणजे ते आपल्याला आणि जगाला सोडून गेले का तर असेही नाही. ते सतत आपल्यात वावरत असतात. वेळोवेळी बोलत असतात. योग्य त्या ठिकाणी त्यांचे दर्शन होत असते. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण झाला तो दिवस म्हणजे ६ डिसेंबर १९५६ : पण, आजही सर्वांच्या न्याय हक्कांसाठी निर्भिडपणे उभा असलेला एकमेव भारतीय ' अमर ' व्यक्तिमत्त्व म्हणजे भारतरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर. या महामानवाला विनम्र अभिवादन, कोटी कोटी प्रणाम.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा