" महापरिनिर्वाण दिन हा अत्यंत दुखःद परंतु तितकाच प्रेरणादायी दिवस , त्यांच्या प्रेरणादायी विचारांवर चालण्याचा आणि समाजाला समतेच्या दिशेने नेण्याचा निर्धार करण्याचा दिवस आहे "
सांगावा न्युज, पिंपरी चिंचवड. दि. ६ : आज सहा डिसेंबर विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. चिंचवड विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार शंकर जगताप यांनी पिंपरी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला भेट देवून बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्हार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, ज्ञानसूर्य, विश्ववंदनीय, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्यास व विचारांना अभिवादन केले. समता, न्याय आणि बंधुता या त्रिसूत्रीवर आधारित समाज निर्माणासाठी त्यांनी केलेला संघर्ष प्रत्येक पिढीला प्रेरणा देणारा आहे.
" महापरिनिर्वाण दिन हा अत्यंत दुखःद परंतु तितकाच प्रेरणादायी दिवस , त्यांच्या प्रेरणादायी विचारांवर चालण्याचा आणि समाजाला समतेच्या दिशेने नेण्याचा निर्धार करण्याचा दिवस आहे."शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" हा विचार त्यांनी संपूर्ण जगाला दिला. त्यांच्या प्रेरणेतून आपण समता, न्याय आणि बंधुतेच्या दिशेने वाटचाल करत, भारताला प्रगतिशील राष्ट्र बनवूया असा संकल्प केला " _ शंकर जगताप ( आमदार : चिंचवड )
आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त पिंपरी येथे रयत विद्यार्थी विचार मंच यांच्यावतीने "एक वही एक पेन संकलन अभियान २०२४" या समाजोपयोगी उपक्रमात सहभागी होत, वंचित आणि बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी आणि उज्वल भविष्यासाठी आम्ही कायम आग्रही आणि तत्पर असू असा विश्वास देखील आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केला.
यावेळी उपस्थितांमध्ये कार्यकारिणी सदस्य श्री.सदाशिवजी खाडे, श्री.माऊली थोरात, जिल्हा सरचिटणीस श्री.नामदेव ढाके, श्री.विलास मडीगेरी, श्री.संजय मंगोडीकर, श्री.अजय पाताडे, श्री.विजय शिनकर, प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष श्री.तुषार हिंगे, मंडलअध्यक्ष श्री.प्रसाद कस्पटे, युवा मोर्चा सरचिटणीस श्री.सतीश नागरगोजे, श्री.नंदू कदम, श्री.गणेश वाळुंजकर, श्री.गणेश ढाकणे, श्री.महेंद्र बावीसकर, अभियंता सेल जिल्हाध्यक्ष श्री.दीपक भंडारी, श्री.नेताजी शिंदे, श्री.नवीन लायगुडे आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा