सांगावा न्युज, पुणे. दि. ६ : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने देशभरात नवीन केंद्रीय विद्यालये आणि नवोदय विद्यालये स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्यासाठी नवीन ३ केंद्रिय विद्यालये निर्माण होणार आहेत. त्या तीन पैकी पुणे जिल्ह्यात NDRF कॅम्पस मध्ये सुदुंबरे येथे एक केंद्रिय विद्यालय निर्माण होणार आहे . याचा लाभ चाकण-तळेगाव MIDC आणि पिंपरी-चिंचवड शहरातील विद्यार्थी आणि पालकांना होणार असल्याची माहिती भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून दिली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा