Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

शुक्रवार, ६ डिसेंबर, २०२४

प्रशिक्षणाच्या संधी निर्माण करण्याबाबत सर्वसमावेशक उपाययोजनांवर भारताचे माजी क्रिकेपटू दिलीप वेंसरकर आणि आमदार शंकर जगताप यांच्यामध्ये झाली सविस्तर चर्चा

 

सांगावा न्युज, पिंपरी चिंचवड. दि. ६ : शहरातील क्रिकेटप्रेमी खेळाडूंंसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत तसेच चांगल्या प्रशिक्षणाच्या संधी निर्माण करण्याबाबत सर्वसमावेशक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. भारताचे माजी क्रिकेटपटू दिलीप वेंसरकर यांनी पिंपळे गुरव येथील आमदार शंकर जगताप यांच्या कार्यालयात जावून आमदारांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी शहरातील खेळाडूंना जास्तीत जास्त संधी आणि सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात विचार विनिमय झाला. यावेळी शहरातील कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

" भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू आणि एल्फ वेंगसरकर अकादमीचे सर्वेसर्वा मा. दिलीपजी वेंगसरकर यांनी आज माझ्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. ८० आणि ९०च्या दशकात भारतीय क्रिकेट संघाला आपल्या अप्रतिम फलंदाजीतून अनेक मालिका जिंकून देण्यात त्यांचे अमूल्य योगदान आहे. १९८३ साली भारताने पहिल्यांदा विश्वविजेतेपद मिळवले, त्यावेळी देखील त्यांनी संघाचे प्रतिनिधित्व करीत मोलाची भूमिका बजावली. आज ते माझ्या कार्यालयात आले, हे मी माझे मोठे भाग्य समजतो. पिंपरी-चिंचवड शहरातही दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या माध्यमातून आजपर्यंत हजारो खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवला आहे. आपले पिंपरी-चिंचवड शहर क्रीडानगरी म्हणून ओळखले जावे आणि या नगरीतून जागतिक दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत, या संकल्पनेतून आम्ही प्रगतीपथावर आहोत. आदरणीय दिलीपजींचे मार्गदर्शन आणि अनुभव निश्चितच आमच्यासाठी दिशादर्शक ठरेल " __ आमदार : शंकर जगताप 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा