सांगावा न्युज, थेरगाव. दि. ८ : पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव परिसरातील, काळेवाडी फाटा ते १६ रस्त्यावर सऱ्हासपणे मद्यपी उघड्यावर रस्त्यात फूटपाथवर बैठका मांडून दारू पीत आहेत. काल दिनांक ७ डिसेंबर सायंकाळी ६.३० ते रात्री १०.३० दरम्यान याठिकाणी मद्यपी दारू पितांना आढळले. ही अशी परिस्थिती दररोज पाहायला मिळत असल्याचे येथील स्थानिक नागरिक आणि वाटसरुंनी सांगितले.
यासंदर्भात प्रत्यक्ष सांगावा न्युज प्रतिनिधींनी पाहणी केली तेव्हा दारू पिणारे लोकं रस्त्यावरच थाट मांडून दारू पीत असल्याचे निदर्शनास आले. हे विचित्र चित्र काळेवाडी फाटा ते १६ नंबर या मुख्य रस्त्यावरील असून येथून ये जा करणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. मद्यपी बिनधास्तपने रस्त्यावर दारूच्या बाटल्या घेवून फूटपाथवर प्यायला बसत आहेत. हे गेली पाच वर्षांपासून असच चालू आहे असेही काहींनी सांगितले.
काळेवाडी फाटा बस स्टॉप मार्गातील बोगदा लगत आपेक्स हॉस्पिटल खाली असलेल्या वाईन शॉप मध्ये मद्य विकत घेण्यासाठी जी लोकं येतात त्यांच्या वाहनांच्या पार्किंगने येथील फूटपाथ तर अडवलाच जातो शिवाय अर्धा रस्ता गिळंकृत केला जातो. त्यामुळे ट्रॅफिकची मोठी समस्या निर्माण होते, परिणामी अपघात होण्याची शक्यता आहे. याच फूटपाथ वरून सामान्य पुरुष आणि कामावरून घरी जाणाऱ्या महिला मुली असतात परंतु याठिकाणी रस्त्याच्या कडेला असे मद्यपी ठाण मांडून दारू पीत बसलेले असल्याने त्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तसेच काळेवाडी फाटा बी आर टी बस स्टॉप कडे जाणाऱ्या बोगदा मार्गात देखील उभे राहून मद्यपी दारू पीत असतात. संबंधित प्रशासनाने याला आवर घालून हे वेळीच थांबवलं पाहिजे अशी येथील स्थानिक लोकांची मागणी आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा