Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

रविवार, १२ जानेवारी, २०२५

"प्रेरणा, निष्ठा, सामर्थ्य, सेवाभाव आणि दातृत्वाचे प्रतिक" लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप "शक्तिस्थळ"  भूमिपूजन ____ आमदार शंकर जगताप

 

| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक १२ : लोकनेते, दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये 'शक्तिस्थळ' उभारण्यात येत आहे. त्याचे भूमिपूजन दिनांक ११ जानेवारी २०२५ रोजी करण्यात आले. या कार्यक्रमास राजकीय सामाजिक तसेच इतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून भाऊंच्या स्मृतीस अभिवादन केले. तसेच पिंपरी चिंचवड शहराच्या विकासासाठी सदैव कार्य तत्पर राहिलेल्या भाऊंचे स्मारक येत्या काळात सर्वाना प्रेरणा व ऊर्जा देईल अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. 

"स्वर्गीय लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप हे फक्त नाव नसून समाजासाठी प्रेरणादायी अध्याय आहेत. त्यांनी निष्ठा, सामर्थ्य, आणि सेवाभावाने समाजाच्या विकासासाठी आयुष्य वेचले होते"

___ चंद्रकांतदादा पाटील (उच्च व तंत्र शिक्षण मंत्री : महाराष्ट्र )

"सामर्थ्य - प्रेरणा - सेवाभाव - निष्ठा -  दातृत्वाचे सिम्बॉल लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप "शक्तिस्थळ"  भूमिपूजन समारंभ आज पार पडला. भाऊंची विकास दूरदृष्टी, शहराच्या सर्वांगीण डेव्होलपमेंट साठीची निष्ठा, सामर्थ्य, सेवाभाव आणि दातृत्वाचे आदर्शवादी असलेले तसेच दैदिप्यमान कार्याचा वारसा स्मरणीय आणि प्रेरित वास्तुरूपी स्मृती जपण्यासाठी "शक्तीस्थळ" निर्माण होत आहे, या वास्तुरूपी स्मृती स्थळाच्या स्वरूपात युवकांसाठी अभ्यासिका, प्रदर्शनी तयार करण्यात येणार आहे.  भावी पिढीला भाऊंचे शक्तिस्थळ उर्जात्मक प्रेरणेचे स्थळ असेल हा संकल्प लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप मित्र परिवाराने केला आहे"

____शंकर जगताप ( आमदार : चिंचवड )

यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीय राज्यमंत्री- सहकार व नागरी विमान वाहतुक मुरलीधरजी मोहोळ, मा.मंत्री आ.डॉ.तानाजीराव सावंत, मावळ लोकसभा खासदार श्रीरंगआप्पा बारणे, मा.उपाध्यक्ष-पुणे मनपा शिक्षण मंडळ विजयआप्पा रेणुसे, भोसरी विधानसभा आमदार महेशदादा लांडगे, पिंपरी विधानसभा आमदार अण्णा बनसोडे,  मावळ विधानसभा आमदार सुनिल शेळके, भोर विधानसभा आमदार शशंकर मांडेकर, मा.आमदार अश्विनीताई जगताप, विधानपरिषद आमदार अमित गोरखे, माजी महापौर सौ.माई ढोरे,  गोसेवक विजुशेठ जगताप,  भाजपा कार्यकारी शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे, राष्ट्रवादी पक्षाचे नेते विठ्ठल उर्फ नाना काटे, कार्यसिद्धी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरिराज सावंत,  मा.नगरसेवक प्रशांत शितोळे, मोरेश्वर भोंडवे, बाप्पू भेगडे, पै.हनुमंतभाऊ गावडे, संदीप जाधव, उमेश चांदगुडे, ह.भ.प. पंकज महाराज गावडे, जयदीप खापरे तसेच सर्व मा.नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाऊंवर नितांत प्रेम करणारे सर्व बंधू-भगिनी आवर्जून उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा