१६ तारखेला कामगारांचे सामूहिक मुंडण आंदोलन : कामगारांच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा आंदोलन तीव्र करू : एक्साईड इंडस्ट्रीज कामगार
| सांगावा न्यूज | चिंचवड, दिनांक १५ : पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड औद्योगिक वसाहतीतील एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने कंपनीत कार्यरत असलेल्या कामगारांवर काही कारणास्तव कामावरून काढण्यात आले. त्यामुळे कारवाई झालेल्या कामगारांनी एकत्रित येवून गेली ३० दिवसांपासून कंपनी गेटसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. कामगारांनी काही रास्त मागण्या करीत पूर्ववत कामावर रुजू करून घेण्याची मागणी केली. परंतु या आंदोलनाकडे व कामगारांकडे एक्साईड कंपनी व्यवस्थापनाने दुर्लक्ष केले असल्याने, कंपनी व्यवस्थापनाचे लक्ष वेधून कामगारांवर झालेल्या अन्यायकडे लक्ष वेधण्यासाठी मकर संक्रांतीचे औचित्य साधून गोड सुसंवाद साधण्यासाठी एक लेखी पत्र कंपनी व्यवस्थापनाकडे सुपूर्द केले आहे. कामगारांकडून पत्ररुपी तीळ गुळ व्यवस्थापनाला दिला आहे. तरीही कामगारांच्या योग्य त्या मागण्या मान्य झाल्या नाहीत आणि पुन्हा कामगारांना पूर्ववत कामावर घेतले नाही तर उद्या दिनांक १६ जानेवारी रोजी कंपनी गेट समोर अन्यायग्रस्त कामगार मिळून सामूहिक मुंडण आंदोलन करणार आहेत अशी माहिती शैलेश कुटे आणि रमेश चौधरी यांनी दिली. तसे पत्र कामगार आयुक्त, एक्साईड कंपनी व्यवस्थापन आणि पोलीस विभागाला दीले आहे.
"सर्व कामगारांच्या तर्फे व्यवस्थापनाच्या सर्व अधिकाऱ्यांना नवीन वर्षातील पहिला सण मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा! "तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला." या पत्रासोबत आम्ही आपणासाठी तिळगुळ पाठवत आहोत. तरी व्यवस्थापनाने आम्हा सर्व कामगारांच्या बाबतीत सकारात्मक विचार करून सर्वांना आहे त्या ठिकाणी पूर्वीप्रमाणे होते त्या पगारावर पुन्हा कामावर रुजू करून घ्यावे आणि मागील काळातील थकीत वेतन देऊन नवीन वर्षातील पहिल्या सणाच्या निमित्ताने गोड सुरुवात करावी हि नम्र विनंती.
( दिनांक १३ जानेवारी ) आज आमच्या आंदोलनाचा २७ वा दिवस आहे तरी दरम्यानच्या काळामध्ये रस्त्यावरील धुळीमुळे, कडाक्याच्या थंडीमुळे आणि डासांमुळे आमच्या आरोग्यावर गंभीर परिमाण होत आहे. तरी या पत्राद्वारे आपणास कळविण्यात येत आहे की येत्या दोन दिवसांत सदर परिस्थितीवर सकरात्मक तोडगा न निघाल्यास परिस्थिती समोर हतबल होऊन नाईलाजाने आम्ही सर्व कामगारांनी गुरुवार दिनांक १६/०१/२०२५ रोजी सकाळी ११ वा. वाजता आंदोलनाच्या ठिकाणी मुंडण आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. सदर आंदोलनादरम्यान कोठेही औद्योगिक शांतता भंग होणार नाही तसेच कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा येणार नाही याची आम्ही संपूर्ण काळजी घेऊ. त्याचप्रमाणे आपणही त्याची जबाबदारी घ्याल हि अपेक्षा. सदर आंदोलन भविष्यात अधिक तीव्र होऊ नये म्हणून लवकरात लवकर सकारात्मक तोडगा काढून सर्व कामगारांचे सर्व प्रश्न मार्गी लावावे हि नम्र विनंती"
___ सर्व कामगार एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेड, चिंचवड.
१) श्री. रेवण नामदेव भाकरे
२) श्री. बाळासाहेब सौदागर अनभुले
३) श्री. सुभाष दगडू गावडे
४) श्री. आत्माराम अनंता धुमाळ
५) श्री. सुनिल शामलाल परसे
६) श्री. संजय गजानन कंडारकर
७) श्री. संतोष पंडित भोसले
८) श्री. रवींद्र मच्छिंद्रनाथ दोडे
९) श्री. भाऊसाहेब नारायण कदम
१०) श्री. शैलेश खंडू कुटे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा