Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

गुरुवार, २० फेब्रुवारी, २०२५

' आणीबाणी ' ने PIFF मध्ये प्रेक्षकांना खळखळून  हसवत दिला सामजिक संदेश

 दिग्दर्शक दिनेश जगताप यांच्या ' आणीबाणी ' ने Piff मध्ये प्रेक्षकांची मने जिंकली 

स्पेशल स्क्रिनिंग वेळी प्रेक्षकांशी संवाद साधताना दिग्दर्शक दिनेश जगताप सोबत प्रा. समर नखाते 

| सांगावा न्यूज | पुणे, दिनांक १८: पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२५ मध्ये १७ फेब्रुवारी रोजी ' आणीबाणी ' हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्या काळी भारतात लागू झालेली आणीबाणी आणि त्या आणीबाणीचा एका खेडेगावात काय परिणाम होतो याचे उत्तम चित्रण आणीबाणी या चित्रपटात केले आहे. लोकसंख्या नियंत्रण करण्यासाठी पुकारलेल्या आणीबाणीत पुरुषांनी नसबंदी करून घ्यावी. स्वतः पुढे येवून या कार्यात सहभाग घ्यावा.  गाव, तालुके आणि जिल्हे यांनी जास्तीत जास्त पुरुषांची नसबंदी करावी टार्गेट प्रशासकीय स्थरतून दीले जाते तेव्हा एका गावात उडालेली खळबळ विनोदाच्या मध्येमायुन पडद्यावर प्रभावीपणे मांडून सामाजिक संदेश देण्यात दिग्दर्शक दिनेश जगताप आणि त्यांची टीम यशस्वी झाली आहे.

या चित्रपटाचे पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात स्पेशल स्क्रिनिंग झाले. आणीबाणी चित्रपटात उपेंद्र लिमये यांनी साकारलेले  अभिमन्यू हे पात्र उत्तमरित्या साकारले आहे. यांच्या विरुद्ध सयाजी शिंदे यांनी धूर्त सरपंच नेहमीच्या स्टाईल मध्ये साकार केला आहे. तर तालीम वस्ताद चे पात्र प्रवीण तरडे यांनी साकारले आहे. वीणा जामकर, सीमा कुलकर्णी आणि प्राजक्ता हनमघर यांनी महत्त्वाच्या ग्रामीण ढंगाच्या भूमिका सहजतेने साकारून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. कथा पटकथा आणि संवाद खुसखुशीत असून चित्रपटाचे संगीत त्या प्रसंगांना अनुसरून चित्रपटात रंगात निर्माण करणारे आहे. चित्रपटाची धाटणी अस्सल ग्रामीण ढंगाची असून त्यातील 

फार्सिकल प्रसंग प्रेक्षकांना खेळवून ठेवतात. यातील चित्रीकरण आणि आर्ट, वेशभूषा, रंगभूषा तसेच केशभूषा सह इतर भौतिक बाबींमुळे आणीबाणीची स्थळ काळ वेळ अचूक सध्या झाली आहे. सिनेमा रिलीज झाल्यानंतर आणीबाणीच्या काळातील दृशात्मक गंमत आणि संवादातील खुसखुशीतपणा सामान्य प्रेक्षकाला नक्कीच आवडेल असे मत पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ' आणीबाणी ' पाहिलेल्या प्रेक्षक, पत्रकार व समीक्षकांनी व्यक्त केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा