Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

गुरुवार, २० फेब्रुवारी, २०२५

महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान पोलादपूर शिवजयंती उत्साहात संपन्न

 

| सांगावा न्यूज | पोलादपूर, दिनांक १९ : अखिल महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील मोठ्या आनंदाने आपण मराठी माणसं आणि शिव प्रेमी लोकं तसेच इतरही जाती धर्माची लोकं एकत्र येवून साजरी करीत असतो. दर वर्षीप्रमाणे यंदाही महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान पोलादपूर येथे दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ रोजी शिवजयंती उत्साहात संपन्न झाली.

जगभरातील सर्व भारतीयांचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज आहेत. दरवर्षी १९ फेब्रुवारीला मोठ्या जल्लोषात शिवजयंती साजरा केली जाते. पराक्रम, शौर्य आणि स्वाभिमानाचे ज्वलंत उदाहरणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवजयंतीच्या दिवशी राज्यातील अनेक भागांमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच पोलादपूर मध्ये शिवजयंती निमित्त नगर पंचायत मधील सफाई कामगार यांचा विशेष सत्कार करण्यात आला, याशिवाय पोवाडा आणि प्रसिद्ध शिवव्याखाते सचिन कमलाकर करडे याचे प्रभावी व्याख्यान झाले. पारंपरिक वेशभूषा करून कार्यक्रम आयोजित केले गेले. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला मुघलांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी मराठी साम्राज्याचा पाया रचला. इतिहासामध्ये पराक्रमी राजा म्हणून म्हणून शिवाजी महाराजांच्या नावाची नोंद करण्यात आली आहे. त्यांनी कधीच कोणत्याही जाती धर्मांमध्ये भेद केला नाही, त्यामुळेच त्यांना रयतेचा राजा अशी पदवी देण्यात आली. हे विचार उपस्थित लोकांना आज शिवजयंतीच्या निमित्ताने अनुभवता आले.

यावेळी श्री महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान पोलादपूरचे अध्यक्ष भाई साबळे, प्रसन्ना पालांडे, शिरीष साबळे, विजय पालकर, नामदेव कळंबे, उदय खैरे उपस्थित होते. नामदेव शिंदे साहेब यांनी सूत्रसंचालन अतिशय उत्तम केले तसेच रुची हॉटेल चे मालक अनंत चिकणे व चंद्रकांत मोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चारही बाजूने फुलांची अतिशय सुंदर आणि मनमोहक पुष्पवृष्टी करून सजावट केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा