' घे उंच भरारी ' महिला गटाच्या वतीने एलप्रो सिटी स्केअर येथे ' छावा ' चे खास स्क्रिनिंग
| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक ५ : मावळ लोकसभेचे महासंसदरत्न लोकप्रिय खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली 'घे उंच भरारी महिला बचत गट' सरिताताई साने यांच्या वतीने महिला सदस्यांसाठी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ज्वलंत चित्रपट 'छावा' चा विशेष शो एलप्रो मॉल इथे आयोजित करण्यात आला. या स्पेशल स्क्रीनिंग मध्ये २७५ महिलांनी छावा चित्रपट पाहिला.या उपक्रमासाठी पिंपरी विधानसभेचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांचे देखील योगदान लाभले.
यावेळी , सौ.सरिता श्रीरंग बारणे, सौ.सरिताताई सने, सौ. सरला उदय आवटे, उदय आवटे, घे उंच भरारी महिला गटा च्या संस्थापक सदस्य योगेश्री उरकूडकर , विजया ससाणे, रेखा हिरेमठ आणि अंजली गुप्ता विजया, योगेश्री, रेखा आणि अंजू यांच्यासह , घे उंच भरारी महिला गटाच्या महिला सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा