पिंपरी चिंचवड महानगरपालिका शाळेतील धोकेदायक लोखंडी खिडक्या बदलून सुरक्षित स्लाइडिंग खिडक्या बसवणं आवश्यक
एकाचा हात चिरडला ; एकाचे डोके फुटले ; आता प्रशासन कशाची वाट पाहतंय ?
| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक २७ : पिंपरी चिंचवड महानगरपालिका थेरगाव संतोष नगर येथील नागू बारणे प्राथमिक शाळेच्या वर्गखोल्यांच्या लोखंडी खिडक्या आणि कार्यालयाच्या लोखंडी खिडक्या या सर्व धोकेदायक पद्धतीने बसवल्या असून त्या विद्यार्थ्यांना जाण्या येणाऱ्या मार्गाच्या स्पेसेज बाजूने उघडत आहेत. त्यामुळे मुले ये जा करतांना किंवा स्पेसेज मधून पळताना, खेळताना त्यांच्या डोक्याला आणि डोळ्यांना लागत आहेत. या धोकेदायक लोखंडी खिडक्या बाहेरील बाजूस उघडत असल्याने ये जा करण्याचा स्पेस खिडक्या व्यापून घेत आहेत. या अशा बाहेर उघडलेल्या लोखंडी खिडक्या विद्यार्थ्यांच्या डोळ्याला लागून विद्यार्थ्याचे डोळे जाण्याची भीती आहे. अशा या धोकेदायक खिडक्या बाहेर किंवा आत नसाव्यात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण होत आहे. त्या बदलून सुरक्षित स्लाइडिंग खिडक्या बसवण्यात याव्यात अशी पालकांची मागणी आहे. या संदर्भात दोन महिन्यांपूर्वी तक्रार आणि विनंती अर्ज करूनही अजून याची अंमलबजावणी झाली नाही. उन्हाळ्याच्या सुट्टीत सदर काम करून घेण्यासाठी वेळ होता पण तो वेळ देखील निघून गेला आहे. आता शाळा चालू झाल्या आहेत. आतातरी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेवून धोकेदायक खिडक्या बदलून विद्यार्थ्यांना सुरक्षित शैक्षणिक वातावरण निर्माण करून द्यावे.
मागील वर्षी एका विद्यार्थाच्या डोक्याला येथील खिडकी लागून डोके फुटले व गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली. तसेच मागील काही काळात दुसऱ्या एका विद्यार्थ्याचा हात खिडकीत चेंगरून त्याच्या बोटांना गंभीर दुखापत झाली असल्याचे येथील शिक्षकांनी सांगितले आहे. अशा या धोकेदायक लोखंडी खिडक्यांमुळे भविष्यात विद्यार्थी विद्यार्थिनींना अपघात होऊन त्यांच्या जीविताला धोका होऊ नये याचे गांभीर्य ओळखून आणि झालेल्या अपघातांच्या घटनांची दखल घेऊन तात्काळ या संबंधित शाळेतील आणि इतरही अशा शाळेत धोकेदायक लोखंडी असलेल्या खिडक्या बदलून सुरक्षित स्लाइडिंग खिडक्या बसवण्यात याव्यात ही नम्र विनंती. तसेच सदर शाळेचे सेफ्टी ऑडिट करून जेथे जेथे धोकेदायक परिस्थिती आहे ती दुरुस्त करून परिस्थिती सुरक्षित करावी.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा