Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

मंगळवार, २४ जून, २०२५

पि.के.चौक (पिंपळे सौदागर) बि.आर.टी. रोड सिंग्नल मुक्त वाहतुक सुरू करा ___ अमोल उबाळे { उपाध्यक्ष : राष्ट्रवादी (SP) }

पिके चौक सिग्नलमुक्त करून वाहतूक सुरळीत करण्याच्या अमोल उबाळे यांच्या मागणीला नागरिकांचा पाठिंबा 

| सांगावा न्यूज | पिंपळे सौदागर, दिनांक २४ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील हद्दीतील बहुसंख्य मुख्य व अंतर्गत रस्ते सिग्नल मुक्त केले असून शहरात काही ठिकाणी सिग्नलमुळे वाहतूक कोंडी होत आहे. आपले पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करीत असताना सिग्नलमुक्त शहर हे एक महत्वाचे पाऊल आहे. जिथे जेथे सिग्नलमुळे वाहतूक कोंडी होती तिथे तिथे अंडरग्राऊंड रस्ते, ओव्हरब्रीज उभारून सुरळीत वाहतुकीची सोया केली आहे. परंतु पिंपळे सौदागर मध्ये लोकवस्ती दाट असल्याने येथील मुख्य रस्त्यावरील सिग्नलमुळे वाहतूक कोंडी होत असून नागरिकांना प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे पि.के.चौक (पिंपळे सौदागर) बि.आर.टी. रोड सिंग्नल मुक्त वाहतुक सुरू करा अशी मागणी राष्ट्रवादी (sp) पक्षाचे शहर उपाध्यक्ष अमोल उबाळे यांनी , महापालिका आयुक्त, उपयुक्त वाहतूक शाखा, पोलिस निरीक्षक सांगावी वाहतूक यांच्याकडे लेखी अर्ज पाठवून मागणी केली आहे. 

अमोल उबाळे यांनी त्यांच्या अर्जात पुढील मुद्दे सविस्तर मांडले आहेत 

१. पि.के. चौका पासुन गोविंद यशदा चौक हे अंतर २०० मी. आहे. गोविंद यशदा चौकात समतल विकलग (ब्रिज) आहे. त्यामुळे कोकणे चौकातुन येणारी वाहतुक पि.के. चौकात सिंग्नल मुक्त केल्यास गोविंद यशदा चौकात सरळ जाणारी वाहतुक ब्रिज वरून जाईल आणि उजवी कडे, डावीकडे वळणारी वाहतुक ब्रिज खालुन जाईल.

२. पि.के. चौका पासुन कोकणे चौक हे अंतर ४५० मी. आहे. तसेच गोविंद यशदा चौकातुन येणारी वाहतुक पि.के. चौक सिंग्नल मुक्त केल्यास सरळ कोकणे चौकातुन युटर्न घेवुन जाईल.

३. सदर बि.आर.टी. रोड वरती हिंजवडी व नाशिक या कडे जाणारी वाहतुक ज्यास्त आहे. त्यामुळे सदर रोड ज्याप्रमाणे मुकाई चौक रावेत हा चौक सिंग्नल मुक्त केला त्याच धर्ती वरती सदर पि.के. चौक (पिंपळे सौदागर) बि.आर.टी. रोड सिंग्नल मुक्त वाहतुक करण्यासाठी या उपाय योजना करण्यात याव्यात.

जनहितार्थ लेखी तक्रारा व विनंती अर्ज करून पि.के. चौक (पिंपळे सौदागर) बि.आर.टी. रोड सिंग्नल मुक्त वाहतुक सुरळीत होण्यासाठी उपाय योजना सुचित करून 

अमोल उबाळे राष्ट्रवादी (sp) पक्षाचे शहर उपाध्यक्ष  यांनी सदर मागणी केली असून याची लवकरात लवकर अंमलबजावणी झाली पाहिजे अशी सामान्य नागरिकांची भावना आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा