| सांगावा न्यूज | दिनांक २९ : दहावी बारावी हे करियरचे प्रथम चरण आहे. या प्रथम चरणाचे गुरु हे आपले आईवडील असतात. आपल्या आईच्या आज्ञात राहणे आणि गुरुजनांकडून शिक्षणा हा सर्वात मोठा आशीर्वाद मानला जातो. या धावत्या विश्वात जगत असताना मोबाईलचा वापर कमी करणे आणि आपल्या ध्येयापर्यंत पोहचण्याची शक्ती अभ्यासातून आणि गुरूजन आईवडील यांच्या मार्गदर्शनातून मिळविणे म्हणजे योग्य मार्गक्रमण कार्याचा सुखरूप मार्ग आहे. याच शिदोरीवर आपले ध्येय निश्चित करावे आणि ते प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पूर्ण प्रयत्न करावेत, असे मार्गदर्शन मंडळाचे अध्यक्ष शैलेश जाधव यांनी केले. १० वी १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ तरुण युवक मित्र मंडळ याच्या संयुक्त विद्यमाने २८ जून रोजी सकाळी ११ वाजता क्षेत्रपाल पोलादपूर येथे शालेय साहित्य देऊन संपन्न झाला यावेळी ते बोलत होते.
आज आपले अनेक मंडळ उपलब्ध आहेत पण ते शेतकरी हे आपल्यासाठी उपलब्ध आहे. आपण कोणता मार्ग योग्य आहे याची निवड आपण करतो. आणि हे करत असताना आईच्या दुःखाचा विसर पडू नये. सुसंगत ही तुम्हांला यश शिखरावर घेऊन जाते, मात्र संगत जर बिघडली तर उध्वस्त होण्यास वेळ लागत नाही,असे उदगार प्रमोद पार्टे साहेबांनी काढले.
दहावी आणि बारावी ही एक अशी आहे की तुमच्या खऱ्या आठवणी आणि पुढे जाण्याच्या महत्वाच्या पायऱ्या आहेत. आजच्या युगात ज्ञानासोबत अनुभवाचे पुस्तक देखील महत्वाचे आहे. तुम्हांला जर यशस्वी व्हायचे असेल तर तुम्ही सातत्याने प्रयत्न करत करीत राहिले पाहिजे. प्रयत्नामध्ये कदाचित अपयशी ठरले तरी ते अपयश पुन्हा प्रयत्न करण्याने सध्या होईल हे नक्की. कारण प्रयत्न हीच यशाची पहिली पायरी आहे. ज्याच्यामध्ये तुम्हांला माझ्या मार्गदर्शनाची गरज लागली तर वेळोवेळी काही अडचण असल्यास मी सदैव मार्गदर्शन करण्यास व मदत करणयासाठी तयार आहे असे अंकुश पार्टे साहेब म्हणाले.
कार्यक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष शैलेश जाधव, गोळेगणी हायस्कूल चे मुख्याध्यापक जाधव सर, मंडळाचे सदस्य, प्रमोद पार्टे, अंकुश पार्टे, अतुल शिंदे, अश्विन पार्टे, सूरज राजपुरे, दत्ताराम शिंदे, मिलिंद जाधव, सुशील पार्टे, गणेश सावंत, राजेश निकम, रोशन निकम तसेच ग्रामस्थ कोंडीराम शिंदे, सखाराम कदम, रमेश जाधव, हरी पार्टे, गणपत शिंदे, दीपक ढेबे, अशोक पार्टे, रमेश निकम, किसन शिंदे, सुरेश जाधव, शाळेचे शिक्षक पिजारे सर तसेच विद्यार्थी पालक उपस्थित होते. पाटील पाटील तसेच सर्व सदस्य मोठ्याने उपस्थित होते.













कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा