Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

गुरुवार, २४ जुलै, २०२५

अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने डांगे चौक येथे रास्ता रोको आंदोलन

रम्मी कृषीमंत्री माणिक कोकाटे यांचा राजीनामा घ्या __मच्छिंद्र चिंचोले

| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड दिनांक , २४ : पिंपरी चिंचवड शहरातील डांगे चौक येथे अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, यावेळी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने सकाळी ११ वाजता डांगे चौक येथील शिवस्मारकास  अभिवादन करण्यात आले. त्यानंतर डांगे चौक येथे छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भुमकर चौक ते आदित्य बिर्ला हॉस्पिटल रोड  येथे रास्ता रोको आंदोलन केले .
यावेळी छावा संघटनेच्या वतीने मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली . यावेळी छावा संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मच्छिंद्र चिंचोले म्हणाले की ,लातूर येथे घडलेला प्रकार निंदनीय असून छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष हे खासदार सुनील तटकरे यांना निवेदन देण्याकरिता गेले होते .त्यावेळी निवेदन दिल्यानंतर त्यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे त्यांच्यावर कारवाई करून त्यांना मंत्र पदावरून  हटवावे अशी मागणी करण्यात आली ,त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी व सुरज चव्हाण यांनी विजयकुमार घाडगे पाटील यांच्यावर भ्याड हल्ला केला , त्यामध्ये विजयकुमार घाडगे पाटील यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. त्या प्रकरणाच्या निषेधार्थ आज डांगे चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आमची मागणी आहे की सुरज चव्हाण याला अटक करून त्याच्यावर  कारवाई करावी व खासदार सुनील तटकरे  यांना सहआरोपी करून त्यांच्यावरही कारवाई करावी व रम्मीमंत्री माणिक कोकाटे यांच्यावर कारवाई करून त्यांचे मंत्रिपद काढून घ्यावे व सुरज चव्हाण याला छावा संघटना प्रतिउत्तर नक्की देणार व त्याला छावाचा दणका काय असतो हे काही दिवसांमध्ये दिसून येईल अशी माहिती छावा संघटनेच्या वतीने देण्यात आली. 
प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांना लातूर येथे अमानुषपणे मारहाण करण्यात आली त्या निषेधार्थ आज पिंपरी चिंचवड शहरांमध्ये डांगे चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, या आंदोलनाच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणांमध्ये मुख्य आरोपी सुरज चव्हाण त्याला अटक करून त्याच्यावर कडक कारवाई करावी व खासदार सुनील तटकरे यांना सहआरोपी करून त्यांचा  राजीनामा घ्यावा व त्यांच्यावरही कारवाई करावी , महाराष्ट्राचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना मंत्री पदावरून काढून टाकून त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सचिन लिमकर यांनी केले.
यावेळी डांगे चौक येथे  रास्ता रोको आंदोलनाच्या वेळी छावा  संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रमीपत्ते खेळत आंदोलन केले ,व मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली, यावेळी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले होते.
या आंदोलनामध्ये रास्ता रोको आंदोलनामध्ये पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मच्छिंद्र भाऊ चिंचोळे, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख प्रमुख असिश भाऊ खंडेलवाल, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सचिन आण्णा लिमकर, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष रामभाऊ सुर्यवंशी, पश्चिम महाराष्ट्र सचिव अनसराज माने, पुणे जिल्हा अध्यक्ष अक्षय भाऊ बोडके, पुणे जिल्हा अध्यक्ष व्यापारी आघाडी गणेश वाघमारे, पुणे जिल्हा अध्यक्ष सर्फराज भाई शेख, पुणे जिल्हा अध्यक्ष शिक्षक आघाडी प्रशांत फड सर, पुणे जिल्हा अध्यक्ष अध्यक्ष उद्योजक आघाडी विष्णु यणकफळे,पुणे जिल्हा उपाध्यक्ष विष्णुराज पवार, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष संजय भाऊ कांबळे, मार्गदर्शक संभाजी ब्रिगेड पिंपरी चिंचवड अध्यक्ष सतिश भाऊ काळे, पिंपरी चिंचवड कामगार आघाडी गोकुळ हसे, हवेली तालुका अध्यक्ष आण्णा खोबरे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष अल्पसंख्याक समिर भाई शेख व आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा