Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

रविवार, २७ जुलै, २०२५

बातमी एक हेडलाईन्स अनेक! असं काय काय घडतंय काळेवाडी पोलिस स्टेशन हद्दीत!

सुदैवाने सुन वाचली! सासू, नणंद, नंदावा यांचा उलट कांगावा! काळेवाडी पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात!

आता, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त लक्ष देणार का! का, वैष्णवी हगवणे सारखं प्रकरण होण्याची वाट बघणार?

महापुरूषांच्या विचार प्रबोधनाच्या कार्यक्रमांना आळा! आणि दारू, मटका, अवैध धंदा मोकळा! काळेवाडी पोलिस स्टेशनच्या हेडमास्तरांची अशी चालते शाळा!

काळेवाडी पोलिस स्टेशन हद्दीत कौटुंबिक हिंसाचार , अवैध धंदे, गुंडांची दहशत वाढत चालली! कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर!

काळेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह ? 

| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक २७ : थेरगाव – काळेवाडी पोलीस ठाण्याच्या अनेक घटनांमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विशेषतः, गुन्हेगारी घटनांमध्ये पोलिसांचा प्रतिसाद आणि तपासकामात निष्काळजीपणा दिसून येतो, ज्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. पोलीस प्रशिक्षणाची , कार्याची आणि लाखी वर्दीची गरिमा मलीन होत आहे.

काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत आहे, आणि पोलिसांचा प्रतिसाद मिळत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अनेक प्रकरणांमध्ये, काळेवाडी पोलिसांकडून तपासकामात निष्काळजीपणा दिसून येतो, ज्यामुळे गुन्हेगार मोकळे फिरतात आणि पीडित व्यक्तींना न्याय मिळत नाही.अनेक गुन्हेगारी खटल्यांमध्ये, पुरावे असूनही, गुन्हेगारांना शिक्षा होत नाही, ज्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. काळेवाडी पोलिसांमध्ये भ्रष्टाचार वाढत आहे, ज्यामुळे त्यांची कार्यक्षमता कमी झाली आहे आणि सामान्य नागरिकांचा काळेवाडी पोलिसांवरील विश्वास उडाला आहे. 

काळेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह असल्यामुळे, नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढते. गुन्हेगारांना पोलिसांची भीती वाटत नसल्यामुळे, ते अधिक गुन्हेगारी कृत्ये करण्यास प्रवृत्त होताना दिसतात. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह असल्यामुळे, नागरिकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास कमी झाला आहे. 

वैष्णवी हगवणे प्रकरण होऊन काही काळ उलटला असता आता काळेवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील रहाटणी परिसरातील एक पीडित महिला तिच्या सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न करते तोपर्यंत काळेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांना जाग येत नाही, पीडित महिलेचा कसाबसा जीव वाचला आता स्वतःची खुर्ची कशी वाचवायची या भीतीने तक्रार दाखल करून घेतली पण आरोपींना अटक करण्याऐवजी स्वतःच्या  दालनामध्ये खुर्चीवर बसून चहापाणी करून पुन्हा घरी पाठवण्याचे धाडस काळेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र बहिरट हेच करू शकतात. महिला सामाजिक कार्यकर्ता आणि पत्रकार यांनी सदर पीडित महिलेला न्याय देण्याचे हेतूने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जाब विचारला असता बहिरट यांनी पुरवणी जबाब मध्ये नणंदेच्या नवर्‍याकडून झालेल्या शारीरिक व मानसिक अत्याचारची अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याबद्दलची दखल घेतली. पीडित महिलेला न्याय मिळावा म्हणून महिला सामाजिक कार्यकर्ता आणि पत्रकार यांनी केलेल्या हस्तक्षेपाचा राग आणि द्वेष भ्रष्ट अधिकारी राजेंद्र बहिरट यांच्या एकेरी आणि अरेरावी भाषेतून पत्रकारांनी अनुभवला आहे. पीडित महिलेला मदत केल्यामुळे बहिरट यांचे काहीतरी आर्थिक नुकसान झाले असावे असे सदर ठिकाणी उपस्थित महिला सामाजिक कार्यकर्ता आणि पत्रकार यांचे मत आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांना सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम यांचा द्वेष आहे आणि अवैध धंद्यांवर जास्त प्रेम आहे, अनेक सांस्कृतिक कार्यक्रम ,सामाजिक कार्यक्रम ,भीम गीतांचे कार्यक्रम होत असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना कायद्याची चौकट, विहित वेळेचे बंधन या सर्व कायद्याचे पाढे पाठ असतात कोणत्याही प्रकारची मदत व संरक्षण मिळत नाही , याच उलट अहोरात्र चालणारे अनधिकृत बार, हॉटेल, अवैध धंदे, हातभट्टी दारू, मटका, जुगार ,क्लब, अवैद्य वाहतूक, यांच्यावर कारवाई करण्यासाठी कायद्याच्या पाढ्यांचा विसर पडतोच पण कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन धंदे चालक-मालक आणि व्यवस्थापक यांना मदत प्रोत्साहन काळेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट आणि काळेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून हप्ते वसुली करणारे त्यांचे काही हस्तक करतात. 

सदर भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर पोलीस आयुक्तांनी कठोर कारवाई करून निलंबित करावे अशी मागणी सर्वत्र होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फॉलोअर