आमदार अमित गोरखे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विकास आराखड्याबाबत लक्षवेधी मांडली
| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक ३ : शहरातील थेरगाव, वाल्हेकरवाडी, मोहन नगर, राम नगर, इत्यादी गावांसह पिंपरी चिंचवड शहरांत विविध ठिकाणी जाचक आणि लोकांची घरे उध्वस्त करून संसार मोडणारे नवीन डिपी पिंपरी चिंचवड शहरासाठी आयुक्त व प्रशासक शेखरसिंग यांच्या मागदर्शनाखाली प्रशासनाने जाहीर केला होता. तो चुकीचा असून लोकहिताचा नाही. त्यामुळे शहरातील लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. या नवीन विकास प्रारूप आराखड्याच्या विरुद्ध शहरात थेरगावमध्ये हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून दोन आंदोलने झाली. शहराच्या इतर भागातील लोकांनी एकत्र येऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत संबंधित विभागाकडे हरकती दिल्या. लोकभावना लक्षात घेता, शहरातील विधानपरिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी मंडळी. विधानसभेत यावर बोलतांना नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने नवीन प्रारूप विकास आराखडा जाहीर केला होता. आराखडा चुकला असेल तर शासन आराखडा रद्द करेल. कारण सदर आराखडा शेवटी निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळास सदर केला जाईल. तेव्हा त्याचे योग्य ते परीक्षण आणि निरीक्षण करून सदर आराखडा नवीन सर्वेनुसार चुकीचा असेल तर राज्य शासन पिंपरी चिंचवड शहरातील आराखडा रद्द करू शकते, असे मोठे आणि महत्त्वपूर्ण विधान विधानपरिषदेत मधुर मिसाळ यांनी केले. या विकास आराखड्याला विरोध म्हणून प्रचंड प्रमाणात नागरिकांच्या हरकती आल्या आहेत. शासनाला आराखड्यात दुरुस्ती किंवा सुधारणा करण्याचे अधिकार आहेत. त्यानुसार आवश्यक बदल केले जातील. तसेच आराखड्यात कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल असे माधुरी मिसाळ यांचे मत शहरातील नागरिकांना दिलासा देणारे वाटले.
: नवीन प्रारूप विकास आराखड्यातील त्रुटी, चुका आणि कोणाच्या फायद्यासाठी आणि कोणाच्या तोट्यासाठी :
* आराखडा बांधकाम व्यावसायिकांच्या फायद्यासाठी तयार !
* प्रशासकाच्या हव्यासापोटी आराखडा तयार !
* रहिवाशी इमारतीवर आरक्षणे टाकली
* निळ्या पूररेषेत येणाऱ्या शाळा, दवाखाने ही बांधकाम योग्य आरक्षणे प्रस्तावित केली !
* रेडझोन हद्दीत बांधकामे प्रस्तावित केली !
* पोलीस आयुक्तालयाची चार आरक्षणे टाकली !
* माता रमाई यांच्या स्मारकाच्या जागेवर पोलीस ठाण्याचे आरक्षण टाकले! हे लोकांच्या भावने भडकवणारे कृत्य आहे.
* टेकड्यांवर घरे दाखवून, नैसर्गिक टेकड्यांचे क्षेत्रसुद्धा निवासी क्षेत्र म्हणून दर्शवले !
* लोकवस्तीत दफनभूमीचे आरक्षण टाकले !
* पक्या घरावर नव्याने आरक्षणे प्रस्तावित केली !
पिंपरी चिंचवड शहरातील या नवीन डिपी च्या जाचक आणि लोकांना हानिकारक ठरणाऱ्या मुद्द्यांना तीव्र विरोध होत असून आराखड्याविरोधात मोठ्या संख्येने हरकती आल्या आहेत. याशिवाय सदर आराखडा इंग्रजी मध्ये बनवला असल्यामुळे संबंधित अधिकारी, सल्लागार व सहकारी यांची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांचे निलंबनाची करावे अशी थेट मागणी आमदार अमित गोरखे यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा