साहित्यरत्नाचा धगधगता इतिहास विद्यार्थ्यांनी आज प्रत्यक्ष रंगमंचावर अनुभवला
आणि उलगडला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जीवनप्रवास
डिजिटल मिडिया परिषद पिंपरी चिंचवड आयोजित, पीएम श्री माध्यमिक विद्यालयात अण्णा भाऊ साठे जयंती साजरी
| सांगावा न्यूज| थेरगाव, दिनांक १ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पी. एम. श्री माध्यमिक विद्यालय थेरगाव येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथीचे औचित्य साधून अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, संलग्न डिजिटल मिडिया परिषद व पिंपरी चिंचवड पत्रकार संघ यांच्यावतीने " लोकशाहीर अण्णाभाऊ साठे " यांच्यावरील एकपात्री नाट्य प्रयोग प्रसिद्ध अभिनेते सिद्धार्थ सीताराम मोरे यांनी सादर केला. अण्णा भाऊंच्या बालपणापासून ते महाराष्ट्राच्या मुक्ती संग्रामा पर्यंत मोरे यांनी अण्णांचा जीवन प्रवास उलगडून दाखवला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हे सामाजिक कार्यकर्ते चंद्रकात नढे होते. आ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष गणेश मोकाशी, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले, पिंपरी चिंचवड शहराचे डिजिटल मिडिया परिषदचे अध्यक्ष विनय सोनवणे, पत्रकार श्रावणी कामत, सागर सूर्यवंशी, महावीर जाधव, रामकुमार शेडगे, माऊली भोसले, रमेश साठे, सिद्धांत चौधरी, संतोष गोतावळे व डिजिटल मिडिया परिषद व पत्रकार संघ पिंपरी चिंचवड चे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
या प्रसंगी पी.एम श्री माध्यमिक विद्यालयचे मुख्याध्यापक बाबासाहेब राठोड, हर्षदा राऊत (पर्यवेक्षिका), सायखेडे एम् . एस्., आव्हाड एम . एस., सावंत व्ही . एल, साळवे बी के, जाधव एस जी, तुपे एस ए, भोसले एस ए, बेद्रे बी .डी, सुतार एस एच, जाधव डी ए, जगताप बी .पी, मुंढे एम एस, जाधव एन डी, आकिब जे एस, शेख टी ए, आटोळे एम एन आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक विनय सोनवणे यांनी केले तर आभार रामकुमार शेडगे यांनी मानले.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा