आदिवासी पारधी समाजातील शिकलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करून जागतिक आदिवासी दिवस सोहळा संपन्न
पारंपरिक व्यवसायाने आपली प्रगती होणार नसून इतर समाजप्रमाणे शिक्षण घेऊन मुख्य प्रवाहात आले पाहिजे ___ माऊली भोसले ( अध्यक्ष : आदिवासी पारधी समाज सुरक्षा दल )
सरकारी योजनांचा लाभ घेऊन आणि भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांचा वापर करून आदिवासी पारधी समजणे प्रगती करून घ्यावी _____ अर्जुन डांगळे ( ज्येष्ठ साहित्यिक/ ज्येष्ठ विचारवंत )
| सांगावा न्यूज | (प्रतिनिधी) दिनांक ९ : जागतिक आदिवासी दिनानिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील शाहूनगर येथे आदिवासी पारधी समाज बांधवांसाठी मार्गदर्शन सोहळा व पारधी समाजातील शिकलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ ९ ऑगस्ट रोजी पार पडला. आदिवासी पारधी समाज सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष माऊली भोसले यांच्या संकल्पनेतून संपन्न झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक अर्जुन डांगळे आणि रिपब्लिकन जनशक्तीचे प्रदेशाध्यक्ष शैलेंद्र मोरे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर आणि कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्यासह मराठी पत्रकार परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष गणेश मोकाशी, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले यांनी आपले मनोगत व्यक्त करून आदिवासी समाज बांधवांना सामाजिक प्रगतीसाठी वेळोवेळी मदत करण्याची भावना व्यक्त केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेनुसार विविध मागासलेल्या समाजाला इतर समाजाप्रमाणे सर्वांगीण विकास करून घेण्याचा मार्ग मोकळा केला. त्या मार्गावर चालणे आता आपले प्राधान्य आहे. सर्व सुख सुविधा आता उपलब्ध आहेत. शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात भरारी घेण्यासाठी दारे खुली आहते. माझी मदत लागली तर कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात आदिवासी समाजाने नावलौकिक मिळवण्यासाठी एक दिशादर्शन कार्यक्रम व प्रशिक्षण घेण्यासाठी येणारा खर्च मी करायला तयार आहे, पण तुम्ही एक पाऊल प्रगतीकडे टाकण्याची अवश्यकता आहे. असे मत भाऊसाहेब भोईर यांनी व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारवाटेवर आपण चाललो तरच आपल्या समाजाची सर्वांगीण प्रगती होईल असे मत मुख्य मार्गदर्शक अर्जुन डांगळे यांनी व्यक्त केले.
आदिवासी पारधी समाजातील वीर पुरुषांची महती सांगून आपला हा देश आणि आपण या देशाचे मूळ रहिवासी मूळ आदिवासी आहोत. त्यामुळे या देशावर मूळ आदिवासी म्हणून पहिला हक्क आपला आहे. तरीही समाज बांधवांना जगण्यासाठी भटकंती करावी लागते हे दुर्दैव आहे. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आपण वेळोवेळी मार्गदर्शन शिबिरे, प्रशिक्षण वर्ग, स्नेह मेळावे घेऊन सातत्याने मार्गदर्शक कार्यक्रमांची आखणी केली तर समाज पुढे जायला मदत होईल. रिपब्लिकन चळवळीच्या नेत्यांनी आदिवासी समाजातील बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य केले आहे. आणि इथून पुढेही सर्वतोपरी मदत आणि कार्य करीत राहू अशी भावना कार्यक्रमाचे अध्यक्ष शैलेंद्र मोरे यांनी व्यक्त केली. यानंतर पुणे महानगरपालिकेतील नगरसेविका राजश्री काळे म्हणल्या की, शिक्षण हे वाघिणेचे दुध आहे , जो कोणी प्राशन करील तो प्रगती केल्याशिवाय राहणार नाही, या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वाक्याप्रमाणे मी कार्य केले म्हणून माझ्यासारखी सामान्य व्यक्तीची प्रगती झाली तशीच प्रगती समाजाने विविध क्षेत्रात करून स्वतःची करून घ्यावी.
उपस्थित विविध मान्यवरांची मार्गदर्शनपर भाषणे संपेपर्यंत शेकडोंच्या संख्येने उपस्थित असलेली आदिवासी पारधी समाजातील लहान थोर मंडळी कार्यक्रमाचा लाभ घेत होती. शेवटी सिद्धार्थ मोरे यांनी महात्मा फुलेंची भूमिका साकारत समाज सुधारणेसाठी असलेले क्रांतीसुर्यांचे कार्य एकपात्री नाटकातून मांडले. याला उपस्थित समाज बांधवांनी भरभरून साद दिली.
भारतीय समाज सुधारक, शूर वीर महापुरुष, महामानवांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. माऊली भोसले ( अध्यक्षा : आदिवासी पारधी समाज सुरक्षा दल ) यांनी समजला दिशा देण्यासाठी, पारंपरिक व्यवसायाने आपली प्रगती होणार नसून इतर समाजप्रमाणे शिक्षण घेऊन मुख्य प्रवाहात आले पाहिजे असे विचार मांडून कार्यक्रमाची प्रस्तावना केली. तर डिजिटल मिडिया परिषद पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष विनय सोनवणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.
कार्यक्रमाच्या वेळी ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत अर्जुनजी डांगळे साहेब, रिपब्लिकन जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शैलेंद्रजी मोरे साहेब, कष्टकऱ्यांचे नेते कामगार नेते काशिनाथ नखाते, मराठी पत्रकार परिषद प्रदेश उपाध्यक्ष गणेशजी मोकाशी, स्नेहछाया प्रकल्पाचे प्राध्यापक दत्तात्रेय इंगळे, रिपब्लिकन जनशक्ती पक्षाच्या पिंपरी चिंचवड महिला शहराध्यक्ष कुसुमताई कदम, सामाजिक कार्यकर्ते कुंडलिक कांबळे, अँड. रमेशजी राठोड साहेब, पारधी समाजातील पहिली नगरसेविका राजश्रीताई काळे, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिलजी वडघुले साहेब, पिंपरी चिंचवड डिजिटल मीडियाचे सचिव सागर सूर्यवंशी, राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, पिंपरी चिंचवड डिजिटल मीडियाचे माजी अध्यक्ष महावीर जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राहुल दादा कलाटे, पिंपरी चिंचवड डिजिटल मीडियाचे विद्यमान अध्यक्ष विनय सोनवणे साहेब, डिजिटल मिडिया परिषद पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष संतोष गोतावळे, रमेश साठे, आदिवासी पारधी समाज सुरक्षा दल या संघटनेचे बारामती तालुकाध्यक्ष नामदेव काळे, उपाध्यक्ष बाळासाहेब काळे, शिरूर तालुका अध्यक्ष अनिल काळे, लखन चव्हाण, अमोल काळे, आनेश भोसले, पुणे जिल्हा उपाध्यक्ष अनिल पवार, अर्जुन पवार, संजय पवार, दिनेश काळे, प्रमोद भोसले, दोस्तगिर काळे, अजय काळे, समीर पवार, अजय काळे, राहुल भोसले, मंजू भोसले, गौरी पवार, मुन्नीरा काळे, ओंकार काळे, संजय पवार, नेहा काळे, श्रीमंत भोसले, तुषार पवार, रितेश पवार, रतनताई भोसले, अनुराग पवार, जय रविराज भोसले इत्यादी कार्यकर्त्यांसह शेकडो आदिवासी जमातीतील नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा