| सांगावा न्यूज | वाकड, दिनांक : १२ : वाकड, ताथवडे, पुनावळे परिसरातील नागरिकांना आपल्या शिधापत्रीका मधील काही दुरुस्ती करायची असेल तसेच नावे कमी करणे, नविन नावे समाविष्ठ करणे, नविन शिधापत्रीका, संजय गांधी श्रावण बाळ योजना, आधार कार्ड दुरुस्ती, श्रम कार्ड, आयुष्यमान कार्ड या नागरी सेवा थेट पुरविण्यासाठी "शासन आपल्या दारी" एक दिवसीय भव्य शिबिराचे आयोज करण्यात आले आहे. नागरिकांनी जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर यांनी केले आहे. बुधवार दिनांक १३ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत नागरिकांसाठी शासन आपल्या दारी हा कार्यक्रम राबविला जाणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करण्यासाठी : श्री. कुणाल वैजनाथ वाव्हळकर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) मध्यवर्ती कार्यालय, श्री चिंतामणी गणेश मंदिराशेजारी, वेणुनगर, वाकड, पुणे ५७. येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा किंवा मोबाईल नंबर : 9823373319 यावर संपर्क करावा.
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून शंकरशेठ जगताप (आमदार चिंचवड विधानसभा), उपस्थित राहणार आहेत तर शत्रुघ्न काटे (शहराध्यक्ष भाजपा), काळुराम बारणे (चिंचवड विधानसभा प्रमुख), यांच्यासह सन्माननिय उपस्थिती
बाळासाहेब भागवत (उपाध्यक्ष रिपाई महा. प्रदेश), अजिज भाई शेख (वाहतुक आघाडी प्रदेश अध्यक्ष), चंद्रकांताताई सोनकांबळे (अध्यक्ष महिला रिपाई महा. प्रदेश), सम्राट जकाते (पश्चिम महा. उपाध्यक्ष) हे उपस्थित राहतील तसेच आणखी प्रमुख उपस्थिती मध्ये विशाल आप्पा कलाटे (उपाध्यक्ष भाजपा), संदिप आण्णा कस्पटे( मा. नगरसेवक), विनायक गायकवाड (मा. नगरसेवक), भारतीताई विनोदे (प्रदेश सदस्य भाजपा), नवनाथ ढवळे (उपाध्यक्ष भाजपा), प्रसाद कस्पटे (मा. नगरसेवक), चेतन भुजबळ (सदस्य भाजपा), रंजित आबा कलाटे (सदस्य भाजपा), रामभाऊ वाकडकर (उपाध्यक्ष भाजपा) , श्रीनीवास कलाटे (सदस्य भाजपा),
रावसाहेब डोंगरे (सदस्य भाजपा), अमोल कलाटे (सदस्य भाजपा) हे उपस्थित राहतील असे मुख्य आयोजक कुणाल वैजनाथ वाव्हळकर (RPI शहराध्यक्ष) यांनी सांगितले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा