| सांगावा न्यूज | सांगवी (पुणे), दिनांक १२ : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप महाविद्यालय, सांगवी (पुणे) येथील दिव्यांग समिती व इतिहास विभागाच्या वतीने सोमवार, दिनांक ११ ऑगस्ट २०२५ रोजी रक्षाबंधन सणानिमित्त एक विशेष सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पुण्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या बालकल्याण संस्था केंद्राला भेट देऊन रक्षाबंधन साजरे केले.
या केंद्रात जीवनधारा मतिमंद महाविद्यालय, सेवा सदन केंद्र व साई संस्कार, पुणे या दिव्यांग शाळांमधील विद्यार्थी उपस्थित होते. महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या मनगटावर प्रेमाचे प्रतीक असलेल्या राख्या बांधल्या, तर विद्यार्थ्यांनी चॉकलेट्स वाटून आनंद वाटला. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करणे व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रेरणा देणे हे महाविद्यालयाचे ध्येय असल्याने असे विविध उपक्रम नियमितपणे राबविले जातात. या उपक्रमाचे नियोजन महाविद्यालयाच्या दिव्यांग समितीचे समन्वयक व इतिहास विभाग प्रमुख डॉ. जितेंद्र वडशिंगकर, उपक्रम समन्वयक डॉ. गुंजन गरुड व प्रा. अक्षय कामठे यांनी केले.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा