| सांगावा न्यूज | लवळे (ता. मुळशी), दिनांक १० : लवळे येथे १० ऑगस्ट, रविवारी गावातील मान्यवरांच्या उपस्थितीत अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम आणि वीर येलजी शंकर गोठे यांच्या अधिकृत छायाचित्र तसेच पुस्तकाचे प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला.
या ऐतिहासिक कार्यक्रमाचे मुख्य अतिथी कार्यसम्राट आमदार शंकरभाऊ मांडेकर होते. त्यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन व अधिकृत फोटोचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमास गावातील अनेक मान्यवर, समाजसेवक आणि विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली.
प्रमुख पाहुणे:
आमदार शंकरभाऊ मांडेकर,
श्री. बाळासाहेब चांदेरे – अध्यक्ष, शिवसेना पुणे,
श्री. अनिल सौंदडे – विश्वस्त, जेजुरी देवस्थान,
श्री. अमोल गोरखे - आरोग्य निरीक्षक पिं.चिं.महानगरपालिका ,
श्री. अविनाश कांबीकर – अध्यक्ष, पिंपरी चिंचवड डिजिटल प्रेस असोसिएशन,
श्री. रणजित राऊत – सरपंच, लवळे,
श्री. संपत राऊत – पोलीस पाटील,
सर्व ग्रामपंचायत व सदस्य कमिटी
तसेच गावातील महिला बचत गटाच्या अध्यक्षा, युवक मंडळ प्रमुख आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची ओळख करून देण्यात आली. वीर येलजी शंकर गोठे पुस्तकाच्या प्रकाशनावेळी लेखकांनी संशोधन प्रक्रिया आणि प्रेरणादायी प्रसंगांविषयी माहिती दिली.
गावातील नागरिक, महिला, युवक आणि मुलांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. उपस्थितांनी अशा कार्यक्रमांमुळे पुढील पिढ्यांना इतिहासाची प्रेरणा मिळते, असे मत मांडले.
सुत्रसंचालन राजेश मारणे सरांनी केले, तर आभारप्रदर्शन योगेश जाधव यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमात ऐतिहासिक अभिमान आणि एकतेचा साज चढला होता.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा