चार अटल सराईत सोनसाखळी चोरांना अटक एकुण १५ गुन्हे उघड
एकूण -१२,३१,०००/- रुपयेचा १०.३ तोळे सोन्याचे दागिने, दोन मोटर सायकल असा मुददेमाल हस्तगत (सुपे अहिल्यानगर सोनसाखळी खेचताना महीलेचा रोडवर पडुन मुत्यु झालेला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा उघड)
| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक १६ : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हददीत चेन चोरीचे गुन्हयांना प्रतिबंध करण्याचे अनुषंगाने मा. पोलीस आयुक्त सो, पिंपरी चिंचवड यांनी चेन स्नॅचिंग गुन्हयांना प्रतिबंध करुन सदर आरोपींना अटक करणेबाबत गुन्हे यांना सूचना दिलेल्या होत्या सदर सूचनांचे अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट ३ कडील अधिकारी व अंमलदार पिंपरी चिंचवड आयुक्तालय हददीतील चेन चोरी गुन्हयांचे सर्व घटनास्थळी भेटी देवून सदर घटनास्थळांचे सीसीटीव्ही तपासुन आरोपीना निध्पन्न केले. सदर आरोपीच्या मागावर गेले एक महीन्यापासुन युनिट ३ चे पथक होते. परंतु आरोपी हे वारंवार राहण्याचीजागा बदलत असल्याने ते मिळून येत नव्हते. पोलीस तपास पथकास मिळालेल्या गोपनिय बातमी नुसार दि.०६/०८/२०२५ रोजी आरोपी नामे १) अक्षय राज शेरावत वय २६ वर्ष रा. हिंगणगाव ता. हवेली जि.पुणे व २) रुपी बध्दीमान नानवत वय २३ वर्षे रा. आष्टापुर फाटा ता. हवेली जि. पुणे यास तळेगाव दाभाडे येथून ताब्यात घेतले तसेच दिनांक ०८/०८/२०२५ रोजी आरोपी नामे ३) अरमान प्रल्हाद नानावत वय २६ वर्ष रा.वढ़ खर्द ता. हवेली जि.पुणे ४) सोन फिरोज गडदावत वय २० वर्षे, रा. सणसवाडी ता. शिरुर जि.पुण यांनाम्हाळुंगे इंगळे येथून ताब्यात घेवून त्यांचेकडे सखोल तपास केला असता आरोपींनी पिंपरी चिंचवड, पु ग्रामीण, अहिल्यानंगर हद्दीत चेन स्नॅचिंगचे गुन्हे केले असल्याबाबत कबुली दिली आहे.
तसेच दि.२०/५/२०२५ रोजी सुपा, अहिल्यानगर येथे आरोपी अक्षय शेरावत व रुपी नानावत यांनी सोनसाखळ चोरी करीत असताना महिलेचा रोडवर पडुन मृत्यु झाला होता सदर बाबत सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाख झाला होता. सदर गुन्हयातील आरोपी मिळुन येत नव्हते. सदर महत्वाचा गुन्हा गुन्हे शाखा युनिट ३ ने उघडकी
आणला आहे यातील आरोपीकडून सोने विकत घेणारा इसम खुशालसिंग जोधसिंग राव वय ४३ वर्षे रा. कृष्णक
अपार्टमेंट रूम नबर १ अंबरनाथ वेस्ट जि. ठाणे यास दि.६/८/२०२५ रोजी अटक करण्यात आलेली आहे. वरील नमुद ०४ आरोपीकडूनएकुण १२ चेन चोरीचे, ०१ सदोष मनुष्यवध, वाहनचोरी ०१, घरफोडी ०१ असे एक १५ गुन्हे उघडकीस आणुन एकुण १२,३१,०००/- रुपयेचा १०.३ तोळे सोन्याचे दागिने, दोन मोटर सायक मुददेमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
१) चिखली गु.र.नं.२९४/२०२५ बीएनएस ३०९ (४).३(५)
२) चिखली मु.र.नं.२४९/२०२५ बीएनएस ३०३ (२)
३) दिधी ग.र.नं.६३/२०२५ बीएनएस ३०९ (४).३ (५)
४) भोसरी एमआयडीसी गु.र.नं. ४४३/२०२५ बीएनएस ३०९ (४),३ (५)
५) भोसरी एमआयडीसी गु.र.नं. ३८/२०२५ बीएनएस ३०९ (४).३ (५)
६) निगडी गु.र.नं २६४/२०२५ बीएनएस ३०९ (४).३ (५)
७) निगडी १.२.नं.११८/२०२५ बीएनएस ३०९ (४).३(५)
८) म्हाळ्गे एमआयडीसी गु.र.नं.२९०/२०२५ बीएनएस ३१८ (१).३ (५)
९) ककण गु.र.नं.४७३/२०२२ भा.दं.वि.कलम ३९२.३४
१०) दापोडी गु.र.नं.९७/२०२५ बीएनएस ३०३ (२), ३ (५)



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा